मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते .  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . प...

सावज (भाग ५)

मध्ये बरेच दिवस झाले तरी दोघांचं भेटणं झालं नव्हतं . त्याने थोडा विचार केला आणि तिला फोन लावला . " कशी आहेस ? " " मी ठीक आहे . तू कसा आहेस ? " " कसा असणार ? " " का काय झालं तुला ? " " अगं किती दिवस झाले तुला भेटलो नाही . " " पण तुला माहित आहे ना का ते . " " अगं पण असं किती दिवस चालणार ? जर आपल्याला एकमेकांच्यात फ्युचर पाहायचं असेल तर पुढं जावच लागेल ना " " हो खर आहे तुझ पण मला कम्फर्टेबल वाटत नाहीये तुला माहित आहे ना . " " हो तेच म्हणतोय . अगदी लगेच ते नाही तसा विचार आपण आता नाही करू शकत . पण थोडं कॅम्फर्टेबल होऊया ना . त्यासाठी थोडं भेटूया बोलूया . " " पण तू इथे कॅम्फरटेबल नसतोस आणि मी बाहेर नसते ... म्हणजे किमान सध्यातरी . " " हो म्हणूनच मी विचार केला कि अगदी तुझ्या घरी ठीक नाही वाटत मला पण तुमचा एव्हढा मोठा परिसर आहे . तिथे फिरुया ना . " " हे चालेल मला . " " मग एक काम करतो आजच येतो मी . " " नको आज नको . आपण उद्या भेटूया का प्लिज . ...

सावज (भाग ४)

सगळ शांत वातावरणात सुरु होत . सगळे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आणि अचानक सर्वांच्या कानावर ती किंकाळी पडली ......  काऊंटर जवळचा सगळा स्टाफ , आलेले कस्टमर सगळे तिकडे धावले .  अशा वेळी सभ्यता किंवा पाळण्यात अर्थ नव्हता त्यामुळे  मॅनेजरने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवला . एक क्षण तो उघडला गेला नाही तोपर्यंत कुणाच्याही जीवात जीव नव्हता . काय झालं असेल याची चिंता आणि उत्सुकता दोन्ही होती . दरवाजा उघडला गेला .  " काय झालं सर , मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला . "मॅनेजरने विचारलं .  " काय तुमचं हॉटेल आहे इतके चार्जेस घेता आणि काय प्रकार आहे इथं ? " तो गुश्यातच बोलला .  मॅनेजरला काय समजत नव्हतं . त्याने परत अदबीनं विचारलं  " सर काय झालं ते तरी सांगा ? " " काय काय इथे पाल पडली तिच्या अंगावर . काय रूम्स आहेत या ? पाली काय झुरळ काय काही पेस्ट कंट्रोल वगैरे काही करता कि नाही ? " तो चांगलाच चिडला होता .  मॅनेजरने जरा आसपास पाहिलं . सोबत स्टाफ आणि दुसरे कस्टमर पण होते त्याने हॉटेल स्टाफ ला खाली काऊंटरपाशी कोणी तिथे जायला सांगितलं . सोबत दुसऱ...

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आप...

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार ...

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क ....

सावज (भाग ३)

कितीवेळ तरी लाईट नव्हती केव्हातरी आली ती . मग तिने तिचा फोन चार्ज केला आणि त्याला फोन लावला . " कसा आहेस ? " " मी ठीक आहे . तुला मघाशी फोन केला होता तर तुझा फोन बंद लागला . " " अरे किती वेळ लाईट नव्हती. आता आली . तेव्हा तुला फोन केला . " " हे बघ माझं काम झालं आहे तू ये इकडे  " त्याने एक पत्ता तिला मेसेज केला आणि त्या पत्त्यावर यायला सांगितल . ती वाटच पाहत होती यासाठी . त्यामुळे ती लगेच तयार झाली आणि निघाली . तिची गाडी पुलापाशी आली तर अजूनही पाणी वरून वाहत होत . पण तिला राहवत नव्हत त्यामुळे तिने तशीच गाडी पुढे नेली . ======================================================= काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.     " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जा...

सावज (भाग २)

तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही  foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला . रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि...

शामली

 प्रेम एक अशी भावना ज्याला रंग रूप वयाच भान नसत . ज्या वयात भातुकली खेळायची त्या वयात त्या दोघांनाही ते जाणवायचं . तो आणि ती दोन टोकाचे तो तो गोरा गोमटा , ती सिम्पल आणि साधी , नाकी डोळी नेटकी पण रंगान जराशी सावळी . अगदी लोभस आणि चुणचुणीत होती ती . कुणालाही आपल्या बोलण्याने आपलंस करणारी . " तुला लागलं ना ." " त्याला काय होतंय तुला नाही ना काही झालं. " " मी ठीक आहे ग . इतकं लागलं तरी तू माझाच विचार करते आहेस. " " मग करणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर . " " इतकं प्रेम करतेस माझ्यावर . " " हो . तुला काही शंका आहे का ? " " अजिबात नाही. तुला एक सांगू . " " काय? " " मी मोठा झालो ना कि तुझ्याबरोबर लग्न करणार. तू करशील ना माझ्याशी लग्न. " " हो करीन ना. " त्या न कळत्या वयात पण दोघांमध्ये इतकं प्रेम इतका स्नेह होता . जवळपास सगळ्यांनीच त्यांना नवरा बायको मानलं होतं. ======================================================== " शामली अग आमच्या रोहितला भारी-भारी स्थळ यायला लागली आहेत. अगद...

सावज (भाग १)

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .      तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ============================================================ " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ... " " स्वतःचा जीवही " त्याचा हात काहीतरी शोधात होता . ============================================================ " Excuse me . " तिने वळून पाहिलं . " माझी गाडी बंद पडली आहे . आणि फोनची बॅटरीसुद्धा संपली आहे . मला एक फोन करायचा होता . " " Sure " असं म्हणत तिने त्याला घरात बोलावलं . चांगलाच प्रशस्त हॉल होता तो . खानदानी श्रीमंती जाणवत होती त्या सगळ्या वास्तूत . " त्याचा फोन झाला आणि तो आभार मानून जाऊ लागला . ...

तिची कहाणी

     आज आसपास सगळं कस शांत आहे . पण एक वेळ होती जेव्हा असं नव्हतं.      " बाजूला हो. त्याने एका हातानं तिला ढकललं . त्याच्या ताकतीसमोर तिचा काय निभाव लागणार होता, ती धडपडत खाली पडली. आज तो भलताच पिला होता व परत दारू पिण्यासाठी निघाला होता . त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता . काहीतरी अघटित होईल म्हणून ती त्याला अडवत होती . पण त्या अवस्थेतही तो तिला आवारत नव्हता . ती परत उठली आणि त्याला विनवू लागली . पण तो तीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . पण ती प्रतिकार करतच होती . शेवटी त्याने तिला परत खाली पाडलं आणि एक जोरदार लाथ मारली. ती तिच्या पोटात बसली. असह्य वेदना होऊन ती तशीच तळमळत पडली. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याने तशाच आणखी चार-पाच लाथा तिला मारल्या. ती अंग मुडपून लाथ पोटात बसणार नाही याचा प्रयत्न करत होती. पण तरीही ते तिला सहन होत नव्हतं. तिला एव्हढं मारून झाल्यावर त्याच समाधान झालं असावं. तो तळमळत पडलेल्या उमाला ओलांडून बाहेर पडला . =============================================================   ...

Love u Ruku

" अरे मैं जाऊ के रुकु ? " " रुकु~~~~ " " अरे रुकु क्या बोलते सिधा रुको बोलो ना . " " तुम जाओ फुफी . ओ तुमको नई बोले . ओ मेरेको बुलारिती . " " ये लडकी का तो मैं क्या करू " " तुम कूच मत करो खाली ये बोलो मुझे क्यू बुलाते " " अरे वो शबनम के पास जाके आ तो " " कायकू "

पर्याय

" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . " अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं . " तू कधी आणि कशी पहिली " " अग  लाल  दिसतायत कि गाल  " " ते होय " " का तुला काय वाटलं  ? " " काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? " " अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? " " नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली " नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही...

बावरे प्रेम हे ..... भुरळ

बावरे प्रेम हे  ... !!!! प्रेम जगातील सर्वात सर्वात सुंदर भावना. आपण कुणावर प्रेम करावे आणि त्याचेही आपल्यावर प्रेम असावे हि किती सुंदर गोष्ट आहे . पण नेहमीच असं होत असं नाही . कधीकधी हे प्रेम व्यक्तही होत नाही आणि वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते . कधीकधी प्रेम व्यक्त तर होत पण समोरच्याचा त्याला प्रतिसाद मिळत नाही . कधी दोघांचंही प्रेम असत एकमेकांवर पण इतर काही कारणांमुळे त्यांना ते मिळवता येत नाही . पण काही लोक फार सुखी असतात ज्यांना हे प्रेम मिळत आणि ते एकत्रही येतात , विवाहबंधनात बांधले जातात . पण तिथंही पुढे काहींचं प्रेम पाहिल्यासारखं, लग्नाआधीसारखं राहतच अस नाही काही लोकांना कल्पना आणि वास्तव यातील फरक जाणवू लागतात काहींच्या आयुष्यात इतर गोष्टीच इतक्या प्रश्नार्थक पाने समोर येतात कि प्रेम कुठेतरी हरवून जात . काहींच्या प्रेमाला वेळेनुसार ओहोटी लागते पण काही असतात ज्यांचं प्रेम हे आयुष्यभर तसाच टिकून राहत व ते त्यांच्या सोबत राहत . प्रेमाचे हे सगळे वेगवेगळे रंग या सर्वांचा आपलाच आनंद आणि आपलाच दुःख असत . या प्रेमरंगाना घेऊन येतो आहे बावरे प्रेम हे च्या माध्यमातून .....

i care for u

" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे " " तुझी काळजी आहे ना " " नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे " " तू असतीस समर्थ तर काय होत " " लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल " " असं काही नाही " " हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? " ती रडवेली झाली होती . " तुला काय करायचं आहे ? ...

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .  " Its ok "  " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय "

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

   " अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .    " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .    " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .    " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .    " का त्याला तू किस करणार आहेस ? "    " काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? " एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "