मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्याय

" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . " अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं . " तू कधी आणि कशी पहिली " " अग  लाल  दिसतायत कि गाल  " " ते होय " " का तुला काय वाटलं  ? " " काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? " " अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? " " नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली " नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही

बावरे प्रेम हे ..... भुरळ

बावरे प्रेम हे  ... !!!! प्रेम जगातील सर्वात सर्वात सुंदर भावना. आपण कुणावर प्रेम करावे आणि त्याचेही आपल्यावर प्रेम असावे हि किती सुंदर गोष्ट आहे . पण नेहमीच असं होत असं नाही . कधीकधी हे प्रेम व्यक्तही होत नाही आणि वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते . कधीकधी प्रेम व्यक्त तर होत पण समोरच्याचा त्याला प्रतिसाद मिळत नाही . कधी दोघांचंही प्रेम असत एकमेकांवर पण इतर काही कारणांमुळे त्यांना ते मिळवता येत नाही . पण काही लोक फार सुखी असतात ज्यांना हे प्रेम मिळत आणि ते एकत्रही येतात , विवाहबंधनात बांधले जातात . पण तिथंही पुढे काहींचं प्रेम पाहिल्यासारखं, लग्नाआधीसारखं राहतच अस नाही काही लोकांना कल्पना आणि वास्तव यातील फरक जाणवू लागतात काहींच्या आयुष्यात इतर गोष्टीच इतक्या प्रश्नार्थक पाने समोर येतात कि प्रेम कुठेतरी हरवून जात . काहींच्या प्रेमाला वेळेनुसार ओहोटी लागते पण काही असतात ज्यांचं प्रेम हे आयुष्यभर तसाच टिकून राहत व ते त्यांच्या सोबत राहत . प्रेमाचे हे सगळे वेगवेगळे रंग या सर्वांचा आपलाच आनंद आणि आपलाच दुःख असत . या प्रेमरंगाना घेऊन येतो आहे बावरे प्रेम हे च्या माध्यमातून ......    

i care for u

" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे " " तुझी काळजी आहे ना " " नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे " " तू असतीस समर्थ तर काय होत " " लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल " " असं काही नाही " " हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? " ती रडवेली झाली होती . " तुला काय करायचं आहे ? &q

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .  " Its ok "  " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय "

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

   " अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .    " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .    " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .    " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .    " का त्याला तू किस करणार आहेस ? "    " काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? " एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "

पूर्वा ( भाग २ )

    " अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . "  राहुलची आई तिला बोलावत होती .     " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा     " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची  इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला.    " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "     " अगं तुला कुठं हि काम सांगू . "

पूर्वा ( भाग १ )

     ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं  माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .

बाप

   " अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं.    " तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं .    " बर जा आत "         त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . "

बाबा नव्हताच तिथे

          स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला ....  कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .           बाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर  व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं  स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छपत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच ख

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

अनवट वाट २

सुरेखा , तिचं  नाव येताच मनात कालवा  कालव  झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान  कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी ....