मुख्य सामग्रीवर वगळा

तिची कहाणी

     आज आसपास सगळं कस शांत आहे . पण एक वेळ होती जेव्हा असं नव्हतं.


     " बाजूला हो. त्याने एका हातानं तिला ढकललं . त्याच्या ताकतीसमोर तिचा काय निभाव लागणार होता, ती धडपडत खाली पडली. आज तो भलताच पिला होता व परत दारू पिण्यासाठी निघाला होता . त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता . काहीतरी अघटित होईल म्हणून ती त्याला अडवत होती . पण त्या अवस्थेतही तो तिला आवारत नव्हता . ती परत उठली आणि त्याला विनवू लागली . पण तो तीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . पण ती प्रतिकार करतच होती . शेवटी त्याने तिला परत खाली पाडलं आणि एक जोरदार लाथ मारली. ती तिच्या पोटात बसली. असह्य वेदना होऊन ती तशीच तळमळत पडली. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याने तशाच आणखी चार-पाच लाथा तिला मारल्या. ती अंग मुडपून लाथ पोटात बसणार नाही याचा प्रयत्न करत होती. पण तरीही ते तिला सहन होत नव्हतं. तिला एव्हढं मारून झाल्यावर त्याच समाधान झालं असावं. तो तळमळत पडलेल्या उमाला ओलांडून बाहेर पडला .
=============================================================

   " काय करताय मी मरमर मरतेय आणि कशीबशी पोरांना दोन घास भरवू बघतेय आणि तुम्ही तो पैसे दारुवर उडवताय. " उमा पोटतिडकीनं म्हणाली .
   " ए मला शहाणपणा शिकवायचा नाही आणि मला अडवायचं नाही. " पण सुभान ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता .
   " अहो पोर उपाशी राहतील , मला थोडस धान्य तरी घेऊन येऊ द्या . "
   " ए चल तुझ्यासाठी आणि पोरांसाठी पैसे नाहीत माझ्याकडे . हो बाजूला. "
   " मी सगळं ऐकलं तुमचं पण आज नाही माझी पोर उपाशी आहेत त्यांच्या पोटाला दोन घास मिळू द्या. "
   " ए गप इकडं माझ्या घश्याला कोरड पडलीय . मला काही सुचत नाही आणि तुझं काय चाललं आहे. "
   " मी नाही बाजूला होणार. त्याने तिला आधी चुकवून आणि मग ढकलून जाण्याचा प्रयत्न केला पण ती आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती . मग तो तिच्यावर तुटून पडला . तिला मरेपर्यंत मारलं. शेवटी तिचे केस पकडून तिला म्हणाला, " माझ्या वाटेत आडवी आलीस ना तर तुझा जीव घेईन. "
   " घ्या माझा जीव . पण मी जाऊ देणार नाही तुम्हाला. "
 शेजारीच अमोल उभा होता . त्याने सरळ अमोलचा गळा पकडला . मग मात्र ती घाबरली .
   " तुम्ही जा मी तुम्हाला नाही अडवत पण त्याला सोडा . " तो तरीही अमोलचा गळा तसाच आवळत   होता . ती त्याच्या पाया पडुन त्याला विनवत होती . त्याने अमोलला सोडून दिल . तो खोकत होता .  त्याचा जीव कासावीस झाला होता. कोपऱ्यात छोटी सुमन भीतीनं थरथर कापत उभी होती . उमाच लक्ष तिच्याकडं गेलं तिने तिला जवळ बोलावलं पण ती येईना मग ती स्वतः तिला घेऊन आली व ते तिघे रडू लागले.
=============================================================
   तिला आता भीती वाटू लागली होती. त्याच हे नेहमीचाच झालं होत. त्याचा असा अवतार पाहून अमोल आणि सुमन लपून बसायचे पण त्याचा आवाज ऐकून थरथर कापत रहायचे . कधी कोणी त्याच्या हाताला लागलं तर तो वाचेल कि नाही हे सांगताही येत नव्हतं.

   त्या दिवशी त्याचा हात जोरात लागला सुमनला . ती निपचित पडली. कितीतरी वेळ उमाला काय करावं ते समजत नव्हतं . तिने सुमनच्या तोंडावर पाणी मारलं तेव्हा कुठे ती जरा शुद्धीवर आली . ती अजूनही थरथरत होती. नवऱ्याचं हे असच सुरु राहील तर तो आपल्याला आणि आपल्या मुलांना जिवंत सोडणार नाही याची खात्री तिला पटली होती.

     एक दिवस त्यानं दारूच्या नशेत उमाला आणि मुलांना घरातून बाहेर काढलं. ती दोघांना घेऊन तशीच बाहेर पडली व स्वतःच्या भावाच्या घरी पोहोचली . भाऊ कुठे बाहेर गेला होता . वहिनीने तिला पाहिलं आणि विचारलं " का वो अशा काय परिस्थितीत आलाय . " तिनं तिला सगळी हकीकत सांगितली .

   " मग पुढं काय " वाहिनीनं विचारलं .
   " पुढचं पुढं आता तर जीव वाचला पोरांचा . "
   " हे बघा ते तुमचं तुम्ही बघा पण तुम्हाला कायम ठेऊन घ्यायला जमायचं नाही आम्हाला "
   " अग आता तर आलोय . मी नाही राहणार जास्त इथं . "
   " हा आधीच सांगितलेलं बरं . "
==========================================================

   " आई, बाबाकडे कधी जायचं ? " सुमन उमाला विचारात होती .
   " का ग ? काय झालं ? " उमाला काळजी वाटली.
   " बाबाची आठवण येत होती . बाबाला बघायचं होत. "
   " अग मारलं असत ना तुला . आणि आपल्याला घरातून बाहेर काढलं म्हणून आलो ना आपण . किती भीती वाटते तुला त्यांची आणि तुला परत तिकडंच जायचंय ? "
   " हो ग भीती वाटते मला तरीपण आठवण येते बाबाची.  बघून येऊया का आपण ? "
   " अग बघायला जायचो आणि त्याने तुला जिवंत नाही सोडलं तर काय करू ? तुम्हा दोघांना काय झालं तर मी कुणाकडं बघू ?  मी कशी जगू ? "
     तेव्हढ्यात रूपा आली . तिच्या कानावर दोघींचं बोलणं पडलं होत .
   " अहो, पोरगी चांगलं सांगतेय कि घरी जायचं आणि तुम्ही का तिला नको म्हणताय ? " - रूपा
   " लहान आहे ती . लेकीला बापाची आठवण यायचीच पण त्याला काय कळेल का ? त्यातनं जीव घेईल तो त्यांचा . म्हणून नको . "
   " मग काय तुम्ही इथेच राहणार काय कायमच ? "
   " अग चार दिवस राहू मग जाऊ "
   " अवो आधीच चार दिवस झालेत कि अजून आहेच का ? "
   " अग जाते बाई जाते "
   " मग जावा कि "
   " जरा दादाला भेटते मग जाते "
   " ते काय एव्हढ्यात येणार नाहीत . आणि परत यालाच कि तुम्ही "
     तिने त्या दोघांना सोबत घेतलं आणि तडक बाहेर पडली . बाहेर तर पडली पण कुठं जावं कुठं नाही काही समजत नव्हतं . शेवटी तिनं आत्याकडे जायचं ठरवलं.

   " हे बघ मला पण आता वयान जमत नाही नाहीतर खंबीरपणे उभी राहिले असते तुझ्यामागं . तुला काम मिळवून देते . धुनभांड्याची काम हायेत पण करशील का तू असली काम ? " आत्या आधारच बोलली .
" पोरांचा जीव जगवायला काय पण करेन आणि कामचं आहे ते त्यात कसला आलाय कमीपणा . "
तिनं उमाला धुण्याभांड्याची काम मिळवून दिली. उमा ती काम करू लागली . पुढे तिला आणखीन काम मिळत गेली . तिला त्रास व्हायचा पण ती करायची . 

   " अग किती काम घेतेस जीवाला बघ स्वतःच्या. " आत्याला उमाची काळजी वाटली.
   " मला नाही काय होत . मला पोरांचं करायचं आहे . " पण उमा विश्वासानं म्हणाली .

उमा कामावरून आली तर  त्यांच्या  गावचा आप्पा आला होता.
   " आप्पा कधी आला ? "
   " आत्ताच आलो बघ . "
   " तुमची तब्बेत कशी आहे ? "
   " हा बरीच म्हणायची "
   " हे कस आहेत ? "
   " त्याच काय सुदिक खर न्हाय. लय दारू प्या लागलाय. "
   " आम्ही असतो तर नसती घेतली यवडी . आम्ही जातो तिकडं मग येईल बंदावर . आता कळलं त्यास्नी. "
    " तो विचार पण करू नको . त्याच डोस्क पाक कामतन गेलय. आग चार दिसामाग म्हादाला लय हानलाय त्यानं . लय मिटवा मिटावी झाली न्हायतर पुलिसात नेला असता त्याला. पण त्याला त्याच काही नाही. त्याच्यात काय सुधारनाच नाही. कुणाला काय करल आणि काय नाय ते सांगता नाय येत. त्यात त्याची तब्बेत अशी म्हणून आता त्याच्या नादालाच कोन लागत नाय. तुमि भायेर पडला ते बर . म्हणून हि पोर तर वाचली. नायतर काय खर न्हवत . आता तू माघारी जायचा विचार सोड. पोरांचं बघ. "
तिच्या डोळ्यात पाणी होत. पण क्षणभरच, आता तिचा निर्धार झाला होता आता तिला तिच्या मुलांना एकटीनेच वाढवायचं होत . सगळ्या जगाशी लढून .

     असेच दिवस चालले होते . आणि एक दिवस अचानक उमाचा भाऊ आला .
   " आक्के, चल आपल्याला तुमच्या गावाला जायचंय . " भावाला असं अचानक आलेलं पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली .
   " का काय झालं ? "
   " तू चल . "
   " आधी सांग मला . "
आता पर्याय नव्हता त्यामुळं त्यानं सांगितलं, "दाजी गेलं "
तिच्या डोळ्यात पाणी दाटलं . पुढे बोलायला तिला शब्दही मिळेनात .
   " आई , बाबाकडे जायचं ? बाबाला भेटायच ? मला किती दिवस बाबाला बघायचं होत . " सुमन म्हणाली  . लेकीच्या त्या शब्दांनी मात्र उमाचा अश्रूंचा बांध फुटला . तरीही ती कशीबशी बोलली
   " चल बाई भेट तू तुझ्या बाबाला . आणि बघून घे काय बघायचं ते शेवटचच. "ते तिथं पोहोचले


     ती मुलांना घेऊन त्याच अखेरचं दर्शन घ्यायला, त्याला शेवटचं बघायला पुढे निघाली.
   " अय, माग व्हा. " या आवाजाने ती बावरली . तिनं वर बघितलं तर अण्णा होता .
   " का काय झालं ? "
   " कुठं होता इतके दिवस . सोडून गेला होता ना ? "
   " अव पोरांच्या जीवाला घाबरून गेलो होतो . " उमाची तगमग होत होती .
   " मग आता कशाला आलाय ? "
   " एकदा शेवटचं बघून घेतो. " उमाला आता राहवत नव्हतं .
   " कशाला पायजे ? एव्हढे दिस नाही पाहिलं आणि आता काय पाहायचं ? "
   " अहो एकदाच पाहू द्या हो " उमा काकुळतीने म्हणाली .
   " अजिबात नाही "
   " अहो पोरांना तरी बघून घेऊ द्या बापाला शेवटचं. " उमाला काही सुचत नव्हतं .
   " अजिबात नाय . "
   " ए हाकलरे त्यांना माग. ए चला उचला तात्याला . "
   " अरे एकदाच बघू द्या कि . " उमा सगळी ताकत एकवटून पुढे जाऊ पाहत होती . पण सगळ्यांनी पुढं येऊन त्यांना शेवटचं दर्शनही घेऊ दिल नाही.


     काय फरक पडला असता ? एकदाच पाहिलं असत ना शेवटचं, पण नाही, सगळा समाज विरोधात उभा होता . आईला, आम्हाला मारताना कुठं होता काय माहित तेव्हा तो कधी मध्ये नाही आला आता मात्र तो समोर आला होता.
बाबाला शेवटचं न पाहिल्याची हुरहूर आयुष्यभर राहील.


तस तर आज सगळं ठीक आहे . दादाला चांगला जॉब आहे . मी माझ्या करिअरचं पहाते आहे. आईला त्यावेळच्या कामाचा त्रास आताही कंबरदुखी आणि गुढघेदुखणे जाणवतो.
पण आता ती सुखात आहे. सगळं ठीक आहे आता, पण असं कधी शांत बसलं कि डोळ्यासमोरून तो संपूर्ण भूतकाळ सर्रकन निघून जातो.

   " सुमन, ए सुमन काय करतेय ?"
   "  काही नाही ग . "
   " अग आधीच तू बाहेर होस्टेलवर गेलीय राहायला दोन दिवस घरी आली आहेस तर राहा थोडी आईसोबत. "
   " आहे ग आई. आहे मी. "

(संपूर्ण )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?