मुख्य सामग्रीवर वगळा

शामली

 प्रेम एक अशी भावना ज्याला रंग रूप वयाच भान नसत . ज्या वयात भातुकली खेळायची त्या वयात त्या दोघांनाही ते जाणवायचं . तो आणि ती दोन टोकाचे तो तो गोरा गोमटा , ती सिम्पल आणि साधी , नाकी डोळी नेटकी पण रंगान जराशी सावळी . अगदी लोभस आणि चुणचुणीत होती ती . कुणालाही आपल्या बोलण्याने आपलंस करणारी .

" तुला लागलं ना ."
" त्याला काय होतंय तुला नाही ना काही झालं. "
" मी ठीक आहे ग . इतकं लागलं तरी तू माझाच विचार करते आहेस. "
" मग करणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर . "
" इतकं प्रेम करतेस माझ्यावर . "
" हो . तुला काही शंका आहे का ? "
" अजिबात नाही. तुला एक सांगू . "
" काय? "
" मी मोठा झालो ना कि तुझ्याबरोबर लग्न करणार. तू करशील ना माझ्याशी लग्न. "
" हो करीन ना. " त्या न कळत्या वयात पण दोघांमध्ये इतकं प्रेम इतका स्नेह होता . जवळपास सगळ्यांनीच त्यांना नवरा बायको मानलं होतं.
========================================================

" शामली अग आमच्या रोहितला भारी-भारी स्थळ यायला लागली आहेत. अगदी श्रीमंत घरातली, MBA, Engg असलेल्या गोऱ्या-गोमट्या मुलींची . " तिला वाईट वाटावं यासाठी असं बोललं होत. पण तिला कशाचीच तमा नव्हती कि फिकीर . दुसर कोणी तिच्यासमोर काही बोलल तर ती त्याला अगदी निरुत्तर करून टाकायची पण इथं रोहितची आई समोर होती म्हणून  तिने काही उत्तर दिलं नाही . फक्त एक स्माईल दिली आणि ती आपल्या विचारात गढली . आज किती दिवसांनी तो येणार होता त्याचा आनंद होता तिला . ती त्यातच रमली होती .


" कधी आलास ? " त्याला पाहून तिची कळी खुलली होती .
" हे काय आत्ताच . " तो शांतच होता . " काय म्हणतेस . "
" काही नाही तू बरेच दिवस नव्हता आता किती दिवसांनी पाहतेय तुला . "ती त्याच्या डोळ्यात पाहून हरवत होती.
" काय ग काय पाहतेय " त्यानं तिला विचारलं .
" तुला पाहतेय " तिने तसच त्याच्या डोळ्यात हरवून उत्तर दिल .
" ते का ? " त्याने पुढं विचारलं .
" असच " ती अजूनही त्यालाच पाहत होती .
" अगं ये ना अशी आपण माझ्या रूममध्ये बसुया ना " त्याने तीचा हात पकडून तिला घेऊन जाताना फक्त विचारायचं म्हणून विचारलं होत पण त्यापूर्वीच तो तिला घेऊन निघाला होता .
" हो चल " तिनेही उत्तर दिल त्याला .
ते दोघे त्याच्या रुममधे पोहोचले .
" ये बस अशी. " ती बसली. " मला काहीतरी सांगायचं आहे तुला. "
" काय सांगायचं आहे. " ती त्याच्या डोळ्यात खोल उतरून त्याचा ठाव शोधत म्हणाली .
" ऐक आपण इतके वर्ष सोबत नव्हतो . तेव्हा ..."तो मधेच थांबला .
" तेव्हा काय ? " तिने विचारलं . त्याने परत सांगायला सुरुवात केली .
" तेव्हा एक मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे. "
क्षणभर तिला आपण काय ऐकतोय हेच समजेनासं झालं होत . तिला आता काय बोलावं हे समजत नव्हतं.
" तुझ्या डोळ्यातलं प्रेम पाहून चूक केल्यासारखं वाटतंय तुला फसवल्यासारखं वाटतंय. पण काय सांगू मधली इतकी वर्ष आपण सोबत नव्हतो. तेव्हा नकळत आम्ही कधी जवळ येत गेलो आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो तेच नाही समजलं. " ती एकदम रडवेली झाली होती. तिला आता तिथं थांबता येणंही अवघड झालं होत. ती कशीबशी " जाते " असं म्हणाली आणि धावत जाऊन तिने स्वतःची रुम गाठली आणि क्षणात स्वतःला बेडवर झोकून दिल. तिच्या अश्रूंचा बांध आता फुटला होता व ते मोती उशीवर सांडून उशी ओली करत गेले. रात्री ती जेवायलाही बाहेर आली नाही. सकाळी कशीबशी स्वतःला सावरत ती बाहेर आली. तिचा सगळा नूरच गेला होता. रोहित तिला परत समजावण्याचा प्रयत्न करत होता.
" I am sorry. मला खरंच खूप वाटतंय ग तुझ्यासाठी. आपण लहानपणी एकत्र होतो पण मधल्या काळात तुझ्यापासून कधी दूर गेलो कळलंच नाही. " बराच वेळ तो तिला समजावत होता . ती नुसती ऐकत होती . पण तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही . थोड्या वेळाने जाते म्हणून ती गेली. रोहितला मनापासून वाईट वाटत होत. पण त्याचा पर्याय नव्हता. दोन तीन दिवस असेच गेले . सकाळी रोहित बाहेर पडला होता . समोर शामली होती . तिने त्याच्याकडे पाहून स्माईल केलं. ते तिच नेहमीच मोकळेपणाचं स्माईल नव्हतं . पण ती बरीचशी सावरली होती .
" बरी आहेस ना ? " त्यानं विचारलं .
" खूप रडवलस तू मला गेले काही दिवस . पण इट्स ओके . जेव्हा तूच माझा नाही राहिलास तर तुला काय बोलू. " आता त्याच्याकडे शब्द नव्हते. तीच म्हणाली "असू दे . होता है . सावरेन मी. पण थोडा वेळ लागेल. "
तीला सावरलेली पाहून त्याने तिला स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला " ती मला ..."
तिने त्याला मधेच थांबवल आणि म्हणाली
" मी विचारलय तुला तिच्याबद्दल ? " त्याने मानेनेच नाही म्हटलं . " मग नको . आत्ताच नको . सध्या नाही माझी मनस्थिती . " इतक्यात सुबोध येताना दिसला. " अरे आलास तू चल निघूया . येते मी " म्हणत ती निघाली. थोडं पुढं गेल्यावर तो म्हणाला
" अगं किती दिवस झाले तू आली नाहीस कॉलेजला . तब्बेत तर ठीक आहे. "
" तू कधी कुणाच्या प्रेमात पडलाय ? " तो तिच्याकडे बघतच राहिला . " मी काय बोलतोय तू काय बोलतेय ? "
" तेच सांगतेय रे . तू असतास कुणाच्या प्रेमात तर तुला कळलं असत . "
" आता मी कुणाच्या प्रेमात पडू ? "
"  राहू दे पडू नको कुठे आपण जाऊया कॉलेजला . "
" तू तुझी सॅक आणली नाहीस . "
" असू दे रे . तुझी एखादी नोटबुक दे . "
तो त्याची सॅक उघडून तिला कोणती नोटबुक द्यावी ते पाहत होता . तेव्हढ्यात तिने ती ओढून स्वतःकडे घेतली आणि एक नोटबुक काढून त्याला दाखवत म्हणाली " केवढंस काम आणि किती वेळ लागत होता ? काय सोनं ठेवलं आहेस का सॅक मध्ये ? "
" नाही ते . "
तिने त्याला  पुढे बोलू दिलं नाही आणि म्हणाली
" जाऊ दे जाते मी . "तिच्या मैत्रिणी येत होत्या . ती त्यांच्यासोबत निघाली .


" ए सुव्या ऐक ना . " शामलीने सुबोधला हाक मारली .
" काय ग ? "त्यानं विचारलं .
" हे काय आहे ? " तिने त्याची नोटबुक उघडून दाखवली . " बदाम काय ? कवितेच्या ओळी काय ? काय आहे कळू तर दे . " म्हणत ती नोटबुक त्याच्यासमोर नाचवत होती . " दे इकडे " म्हणत त्याने तिच्या हातून ती नोटबुक घेण्याचा प्रयत्न केला पण तिने ती त्याच्या हाती लागू दिली नाही .  " हो हो तुलाच देणार आहे पण सांग तरी कोण आहे . "
" काही नाही ते  दे इकडे " तो नोटबुक तिच्या हातातून घेण्यासाठी धडपडत होता . पण ती त्याच्या हाती लागू देत नव्हती .
"अरे लाजलास कि काय ? "
" ए तस काही नाही . "
" मग कस "
" ए गप ग "
" अरे अरे सांग तरी . "
तो तिच्या कितीही खोदून विचारण्याला टाळून तिथून सटकला .


" काय अरे टाळतोय का मला तू ? "
" अगं काय चाललं होत तुझं त्या मुलींसमोर. तुझ्या माझ्यात या गोष्टी झाल्या तर  ठीक आहेत पण त्यांच्यासमोर कशाला ? "
" ओह इम्प्रेशन खराब होतंय वाटत स्वतःच्या प्रेयसी समोर . तिच्यासमोर ते सांभाळायचं आणि आम्ही कोण आमच्या समोर कसही. असच ना. "
" हे बघ असं काही नाही . आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो चेष्टा करतो म्हणून आपण या गोष्टी बोललो तर ठीक आहे . बाकी कुणाशी मी बोलतही नाही . त्यांच्याशी बोलायचं काय संबंध आहे . "
" हम्म  माझ्याशी बोलतो ना मोकळेपणाने . मग सांग ना कोण आहे ती . "
तो अजूनही काही सांगत नव्हता .
" साहेब मी जे पाहिलं ते फक्त तेव्हढच नव्हतं एका ठिकाणी हा S पण होता बर का . काय हे S . किती पोरी आहेत S नि नाव सुरु होणाऱ्या पण मी जवळपास सगळ्यांना check केली पण त्यातली कोणीही नाही वाटली. मग कोण आहे हि. " ती स्माईल देत त्याच्याकडे पाहत होती . त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल होती.
" हे  लेटर I Love you 'S' . का बोलला नाहीस ? "
" तेव्हा तू हो म्हणाली असतीस ? "
" बरोबर आहे तुझं. तुझ्यासोबत आहे इतके दिवस पण तुला फक्त गृहीत धरत आले. तुला माहित आहे जेव्हा मी त्या दुखत होते तेव्हा फक्त तुझीच आठवण आली. जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्या माणसांची आठवण येते ना . तेव्हाही नाही कळलं पण नंतर विचार करत होते प्रत्येक वेळी तू होता माझ्या सोबत . माझ्या प्रत्येक आनंदात , प्रत्येक दुःखात , अगदी तुला पटो न पटो तू माझ्यासाठी सारकही करत होतास . किती प्रेम करतोस आणि वर सांगताही नाहीस . " तिला काही न बोलताच तिला सगळं समजलं आणि तिने ते स्वीकारलही . आपण स्वप्नात तर नाही ना . असा विचार तो करत होता .
" मग गर्लफ्रेंडला मिठीत नाही घेणार का ? " त्याने तिचे हात हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात  पाहून म्हणाला " तू तर माझ्या मनात आहेस प्रत्येक श्वासात आहेस " ती त्याच्या मिठीत विरघळत गेली .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?