मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय आणि नग्नता

        आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच  जन्माला येताना बिना  कपड्यांचाच  जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही .

श्वानांचे प्रेम

     तस पाहिलं तर कुत्रा या प्राण्याबद्दल मला फारस कधी प्रेम नव्हत . पण या प्राण्याला माझ्याबद्दल नेहमी प्रेम वाटत आलेले आहे . पूर्वी अगदी फार भुंकणारे कुत्रेहि मला भुंकत नसत . याच कारण काही माहित नाही . पण बहुधा माझा अंधविश्वास याला कारणीभूत असावा असे वाटते . मला असे वाटायचे कि आपण जीन्स घातली असल्यामुळे त्याचे दात काही या जीन्सला पार करून आपल्यापर्यंत पाहोचणार नाहीत व फक्त आपण हात वर केला तरी तो आपल्या हाताला चावू शकणार नाही .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

शृंगार ५

       एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .

शृंगार ३

          उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो . मी स्वतःकडे पाहिल , मी पोटात लाथ बसु नये म्हणून माणूस ज्या पोझीशनमधे असतो त्या पोझीशनमधे होतो . ती लाथ मारणार होती , छे उगाचच काहीही . तिने नुसता असा काही अविर्भाव केला कि कृतीची गरजच नाही पडली . आणि मी घाबरलो , छे ती नुसती प्रतीक्षिप्त क्रिया होती . जाऊदे दमते बिचारी काम करून  . आज झोपूदे उद्यापासुन येईल ना ती .           बाहेर पडलो तर रस्त्यावर दोन - तीन कुत्री आणि मीच होतो . जिममधे पोहोचलो तिथ एक कुत्रा

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .

शृंगार १

          उरोज  नितंब  आणि   तसलेच  काही  शब्द  असलेल पुस्तक  होत  ते  .  शेजारी  बसलेला  मुलगा  ते  वाचत बसला  होता  .  छे  नुसत  अस  काही  वाचुनही  लोक एक्साईट  होतात  . नाही  म्हणजे  आपण  एक्साईट व्हायला  हव  कि  नको  .  काही  हरकत  नाही ,  पण  आता आपले  दिवस  कर्तृत्व  दाखवण्याचे  ,  कृती  वाचत बसण्याचे  नाहीत  .  पण  काय  हरकत  आहे  अस  वाचून स्फुरण  चढणार  असेल  तर  .