मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग ४)

सगळ शांत वातावरणात सुरु होत . सगळे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आणि अचानक सर्वांच्या कानावर ती किंकाळी पडली ...... 
काऊंटर जवळचा सगळा स्टाफ , आलेले कस्टमर सगळे तिकडे धावले .  अशा वेळी सभ्यता किंवा पाळण्यात अर्थ नव्हता त्यामुळे मॅनेजरने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवला . एक क्षण तो उघडला गेला नाही तोपर्यंत कुणाच्याही जीवात जीव नव्हता . काय झालं असेल याची चिंता आणि उत्सुकता दोन्ही होती . दरवाजा उघडला गेला . 
" काय झालं सर , मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला . "मॅनेजरने विचारलं . 
" काय तुमचं हॉटेल आहे इतके चार्जेस घेता आणि काय प्रकार आहे इथं ? " तो गुश्यातच बोलला . 
मॅनेजरला काय समजत नव्हतं . त्याने परत अदबीनं विचारलं 
" सर काय झालं ते तरी सांगा ? "
" काय काय इथे पाल पडली तिच्या अंगावर . काय रूम्स आहेत या ? पाली काय झुरळ काय काही पेस्ट कंट्रोल वगैरे काही करता कि नाही ? " तो चांगलाच चिडला होता . 
मॅनेजरने जरा आसपास पाहिलं . सोबत स्टाफ आणि दुसरे कस्टमर पण होते त्याने हॉटेल स्टाफ ला खाली काऊंटरपाशी कोणी तिथे जायला सांगितलं . सोबत दुसऱ्या कस्टमरलाही घेऊन जायला सांगितलं . एका रूम सर्व्हिस करणाऱ्या बॉयला तेव्हढं थांबायला लावला . बाकीचे गेल्यावर तो म्हणाला 
" सॉरी सर आपल्याला अशी असुविधा झाली . तस पेस्ट कंट्रोल तर केलं होत पण कस कोण जाणे ... आता तर काही करता येणार नाही पेस्ट कंट्रोलच कारण त्याने तुम्हाला त्रास होईल . पण आम्ही उद्या हा त्रास पूर्णपणे दूर करू . सध्या आम्हाला थोडा वेळ द्या ती पाल लगेच दूर करतो म्हणत तो रुमबॉयला पुढे जायला सांगत होता . तो पुढे निघाला तेव्हढ्यात त्याला थांबवत तो म्हणाला 
" आता राहू द्या सकाळी बघा . आता आम्हाला झोपायचं आहे . "
" ओके सर . तुम्ही करा आराम . "
परत दिलगिरी व्यक्त करत सकाळी येण्याबद्दल बोलून तो गेला . 
=============================================================

" कुठ गेलेला तू . तिथे तर नाही जिथे एक खूप मोठ झाड आहे आणि त्याच्या आसपास फार विचित्र अर्धवट बांधलेल्या , अर्ध्या तुटलेल्या अनेक मूर्ती आहेत . " 
" हो . आणि तिथे एक जुन्या वाड्यासारख काही आहे ना . " 
ते ऐकून तिची चर्या एकदम बदलली . ती भीतीने थरथर कापत होती . आणि घाबरतच ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली . 
तो तिला सावरायचा प्रयत्न करत होता पण ती खूप घाबरली होती . त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने जोरात किंकाळी फोडली . त्याला क्षणभर काहीच सुचेना . तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता . त्याने तिला पाणी दिल तिने ते पिलं तिला थोडं बर वाटलं . तेव्हढ्यात दरवाजा जोरजोरात ठोठावला गेला ती परत घाबरली . त्याने तिला शांत राहायला सांगितलं आणि दरवाजा उघडला . बाहेर सगळी गर्दी होती . प्रत्येकजण आत डोकावून पाहायला बघत होता . एकतर असा जोरजोरात दरवाजा वाजवून ते आले आणि आता हे त्याने त्याचा संयम सुटला आणि तो त्यांची चांगलीच खरडपट्टी काढू लागला . 
थोड्या वेळाने सगळे गेले तेव्हा त्याने दार ओढून घेतलं . 
तिला आधी शांत केलं आणि म्हणाला 
" काय झालं इतकी का घाबरलीस तू ? "
" तू जिथे गेला होतास ती जागा चांगली नाही . म्हणतात तिथे जो गेला तो परत जिवंत येत नाही . आणि तू ... " तिच्या डोळ्यात अजूनही भीती तशीच होती . 
" तुला काय वाटतंय मी मेलोय ? आणि इथे काय माझं भूत आहे ? अग इतकी ग कशी तू घाबरट  मला तर सांगत होतीस अशा निर्जन जागी राहायची तुला भीती वाटत नाही आणि याला घाबरते आहेस ? अशा गोष्टींवर तुझा विश्वास आहे . अग नुस्त्या गोष्टी असतात या . यात खर काही नसत . आणि तू  माझ्यासोबत आहेस इतका वेळ असं असत का भूत ? " 
तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली . तिला जरा बर वाटत होत पण तिची भीती पूर्णपणे नव्हती गेली . ती कितीतरी वेळ त्याच्या मिठीतच विसावली . त्याने परत सुरुवात करण्याचा विचार केला . तशी ती म्हणाली 
" आज नको आता ठीक वाटत नाही . "
" ठीक आहे झोप तू मी आहे काळजी करू नकोस . " 
सकाळी उठून ते दोघे निघाले . ती अजूनही पूर्णतः नॉर्मल न्हवती त्यामुळं दोघांनी फार न बोलता आपआपल्या वाटेने जाणं निवडलं . परत भेटण्याबद्दल त्यानेच विचारलं . पण तिला आता तिच्या घरीच त्यांनी भेटावं असं वाटत होत . पण त्याला ते पटत नव्हतं त्यामुळे सध्या काही दिवस दोघांनीही दूरच राहायचं ठरवलं . 

...क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "