मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग २)

तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला .

रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात कुजबुजली
" मला अशी अधुरी नको ना सोडूस . चल ना . "
असं म्हणत ती आर्जव करत होती . त्याने समोर पडलेल्या पाकिटातून एक सिगारेट बाहेर काढली . ती त्याच्या पाठीवर किस करत होती . त्याने सिगरेट शिलगावली आणि त्याचा कश घेत तो खिडकीतून बाहेर बघत होता . ती इतकी आतुर झाली होती मात्र तो शांत होता .
" ये ना रे . काय झाल ? " तिने त्याला परत हाक दिली आणि त्याला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती .
" बस जरा " म्हणत त्याने तिला आपल्या शेजारी बसवल .
" कस आहे मला तू खूप आवडलीस आणि मी तुझ्याबरोबर एकरूप होणार होतो पण मधेच मला तुझ्या पहिल्या नवऱ्याची आठवण आली आणि मग जाणवल हा बेड , हि रूम इथे तुम्ही दोघ असाल ,  एकत्र आलेले आणि इथंच मला ... मला नाही ठीक वाटलं . मी हा विचार आल्यावरपण तसाच पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण मला तोच सर्वत्र जाणवत होता . मग माझा मूडच गेला . "
" come on . तो नाहीए आता . आता फक्त आहे ते तू आणि मी . " ती त्याला समजावत म्हणाली .
" नाही I am not OK with that . म्हणजे किमान या जागेवर तरी , या वास्तूत तरी नाही . या वास्तूत असं काहीतरी आहे जे जाणवतंय आणि त्यामुळे नको . "
" मग आपण बाहेर जाऊया ना . "
" कुठे जाणार आहेस पावसात ? "
" come on असं नको ना करुस माझी काय अवस्था झालीय ते तुला काय सांगू . "
" सोड मला " म्हणत त्याने तिचा हात झिडकारला . ती तशीच जाऊन बेडवर पडली . कितीतरी वेळ तळमळत पहाटे कधीतरी तिला झोप लागली .

तिला जाग आली तेव्हा तो तिला उठवत होता . ती पटकन उठून बसली .
" काय हे तू तयार पण झालास मला काही बोलला का नाहीस . "
" मी निघतो आता . तुझी झोप नीट नाही झाली . तू आराम कर . "
त्याच्या वाक्याने ती चिडली . शेजारची उशी फेकून म्हणाली
" माझी काय अवस्था झाली आहे आणि तुला झोपेच पडलं आहे . "
हे बघ मी तुला सांगितलं ना कारण त्याच "
" but I want that "
" पण इथे शक्य नाही . "
" तू म्हणशील तिथं यायला तयार आहे मी . तू थांब मी लगेच तयार होऊन येते . जाऊ आपण . "
असं म्हणत केस सावरत ती स्वतःच आवरू पहात होती .
" एक मिनिट शांत हो . आता नाही . माझं काम आहे . आपण नंबर एक्सचेंज करू . मी तुला फोन करेन . "
" ए मला नाही ना धीर धरवत . तुझ कधी काम होणार मग तू कधी फोन करणार ? "
" ठीक आहे मग काय करू ? "
" तू लगेच फोन कर . "
" इथूनच करू का ? "
" नको तिकडे पोहोचलास कि कर फोन . "
" ठीक आहे करतो मी फोन . "
त्यांनी नंबर एक्सचेंज केले . अचानक तिच्या लक्षात आलं त्याचा फोन सुरु होता . पण त्याच्या फोनची तर काल बॅटरी संपली होती .
" अरे तुझ्या फोनची बॅटरी संपली होती आणि तुझ्याकडे तर चार्जर पण नव्हता मग कस ? "
" अग इथंच सापडला चार्जर त्याने केला चार्ज . "
" इथे कुठे माझा फोनचा चार्जर वेगळा आहे . मग हा ... "
त्याने तिला मधेच अडवलं आणि म्हणाला
" काय ते चार्जरच घेऊन बसली आहेस . ते सोड मला उशीर होतो आहे . " म्हणत तो निघाला .
ती कितीतरी वेळ त्याला पाठमोरा जाताना पाहत होती . तिने फोन चेक केला त्याची बॅटरी लो झाली होती . ती तो चार्ज करण्यासाठी पाहू लागली तर लाईट नव्हती . आता अजून थोडा वेळ लाईट नाही आली तर तिचा फोन बंद होऊ शकेल अशी स्थिती होती . मग नंतर त्याचा फोन आला तर . त्याला माझा फोन बंद लागेल . त्यापेक्षा मी फोन करू का त्याला . नाही तस केलं तर त्याला राग येईल . ती असा विचार करत होती तेव्हढ्यात त्याचा फोन आला . त्यानं तो पोहोचल्याच सांगितलं . तिला पुढे बोलायचं होत तितक्यात फोन बंद झाला . तिने पाहिलं तर त्याची बॅटरी संपली होती . असू दे त्याच्या पोहोचण्याची तर खबर मिळाली . आता काय करावं याचा विचार ती करत होती . लाईट नसल्यामुळे काही करता येणार नव्हतं . मग तिने काही नाही तर रेडिओ सुरु केला . त्याच्यावर बातम्या सुरु होत्या . दोन बातम्या तिला नीट ऐकू आल्या नाहीत कि काय कुणास ठाऊक .
' शहराला जाणाऱ्या पुलावर अजूनही पाणी असल्यामुळे तो कालपासून बंदच आहे . पावसामुळे लाईटचा काही बिघाड झाला आहे आणि लाईट जी रात्री गेली आहे ती आज संध्याकाळपर्यंत परत येण्याची शक्यता नाही . ' काल मला कितीतरी वेळ झोप आली नाही . मी तशीच पडून होते आणि त्यावेळी तो तिथेच होता बसून . तो कुठेही गेला नाही . लाईट गेल्याच आठवतंय मला तोपर्यंत मी जागीच होते आणि त्यावेळी गेलेली लाईट अजून आली नाही मग याने फोन चार्ज कधी केला ? तो रात्री आला तेव्हापासून माझ्या समोरच आहे मग त्याला कधी वेळ मिळाला आणि पुलावर तर अजूनही पाणी आहे मग तो कसा गेला पलीकडे .

तिला ऐकलेली अजून एक बातमी आठवली . ' कोणी बाईकस्वार पुलावरून वाहून गेला होता . '

.... क्रमशः




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर