मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? " एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "

पूर्वा ( भाग २ )

    " अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . "  राहुलची आई तिला बोलावत होती .     " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा     " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची  इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला.    " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "     " अगं तुला कुठं हि काम सांगू . "

पूर्वा ( भाग १ )

     ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं  माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .

बाप

   " अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं.    " तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं .    " बर जा आत "         त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . "

बाबा नव्हताच तिथे

          स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला ....  कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .           बाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर  व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं  स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छपत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच ख