मुख्य सामग्रीवर वगळा

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत .

" अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क . त्यांना बघून त्याने आवरत घेतलं . 
" अरे दादा तुम्ही " तो डोळे पुसत म्हणाला . 
" हो मी चल जरा स्ट्रॉंग बनवू तुला " असे म्हणून त्यांनी हातातली बॉटल दाखवली . 
" अरे दादा मी पीत नाही . तुम्हाला तर माहित आहे . " त्याने नकार दर्शवत म्हटल . 
" अरे म्हणून तर असा आहेस " त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजावण्याच्या सुरात म्हटलं . 
" इट्स बॅड थिंग . " त्यानं त्याच मत मांडलं . 
" अरे गर्ल्सला बॅड बॉईजच आवडतात . गुड बॉय फक्त फ्रेंड किंवा भाऊ होतात . सो बी बॅड . " त्यांनी त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं होत . आता त्याचही मन ठिकाणावर नव्हतं . त्याचेही पाय तिकडे वळले . 
===========================================================


मधे काही काळ लोटला . 
आणि आता .... 

" अरे ती इकडचं बघतेय का ? " राजेश एक्साईट होत म्हणाला . 
" हं ... " तो मात्र निश्चल होता . त्याने फक्त रहस्यपूर्ण स्माईल दिली . 
" काय भाई कस जमत तुला ? " सौरव म्हणाला . 
" कुछ नाही, हो जाता है ... " तो शांतच होता आणि शांत राहूनच उत्तरला . 
" भाई तू तो एक्सपर्ट है " सगळे चकित होऊन पुढ होणाऱ्या घटना पाहत होते . 


" कोण आहेस तू आणि कधीपासून सुरु आहे हे ? " तिने त्याला विचारलं .
" हम रेत है, हवा के झोके है  . हाथ से कब फिसल जाऐंगे पता भी नही चलेगा . " त्याची ती गूढ स्माईल अजूनही त्याच्या ओठावर होती . 
" मी थोडीच जाऊ देईन तुला ...." ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याला आव्हान करत म्हणाली . 
" खरच जमेल का तुला मला अडवायला ? " त्यानंही सहजच तिला विचारलं . 
" ट्राय तर करून बघ . " ती त्याच्या डोळ्यात नजर रोखून म्हणाली . 
तो फक्त हसला अगदी गालातल्या गालात . तेच त्याच उत्तर . तुम्हाला काय काढायचा तो अर्थ काढा . 


ती नुकतीच उठली होती आणि बेडवर त्याला न्याहाळत  बसली होती . डोळ्यात पूर्ण न झालेली झोप आणि रात्रीची धुंदी होती . त्यातच ती लाडीकपणे म्हणाली 
" एव्हढ्यात निघालास ? थांब ना ... " 
त्याच आवरण सुरूच होत . तो काहीतरी घ्यायला बेडपाशी आला . तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात प्रेमाने पाहू लागली . त्याने कोरडेपणाने सांगितलं काम आहे मला महत्वाच . लगेच निघाव लागेल . ती प्लिज म्हणाली . 
" हे बघ थांबता येण्यासारखं नाही . मी निघतोय . " असं म्हणत तो स्वतःच आवरू लागला . 
" अरे मला आवरू तर दे . " ती पटकन उठून आवरायला पाहत होती . 
" हे बघ मला पटकन निघायचं आहे . तू निवांत आवर . " त्यानं तिला अडवलं . 
" अरे पण चावी ? " तिने तिची शंका बोलून दाखवली . 
" राहू दे तुझ्याकडे . "
तिने 'बर' म्हणेपर्यंत तो बाय करून निघालाही . 
===========================================================
त्याच्या डोळ्यासमोरून झरझर तो प्रवास चालला होता.  
कधी नाही ते त्याने ड्रिंक करायला सुरुवात केली होती . त्या दुःखाला विसरण्यासाठी त्याला त्याची गरज होती . कसलाही विचार न करता तो पीत होता . अगदी बेधुंद होत होता . त्याला त्या वेळी त्या सहाऱ्याची गरज होती . एक दिवस भाईने त्याला अडवलं त्याला समजावल आणि त्याला जिमची वाट दाखवली . त्यानं अगदी अनिच्छेनेच सुरुवात केली . कारण तो त्यांना मानत होता . सुरुवातीला त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता पण आता तिथं जाऊन तो आपलं दुःख विसरत होता. त्यामुळे त्याला ते आवडू लागलं होत . आता तर त्याचा व्यवसायही चांगला चालला होता . अगदी सरळ मार्ग सोडून आता तो व्यावहारिक झाला होता . त्यामुळे पैसा चांगला बरसू लागला होता . तब्येतही सुधारत चालली होती . या दोन्हीचा कॉन्फिडन्सने चेहऱ्यावर एक नवीनच चमक आली होती. आणि हल्ली एक नवीनच गोष्ट त्याला जाणवू लागली होती . कितीतरी मुली त्याच्याकडे आकर्षित होऊ लागल्या होत्या . आपल्याला झालेल्या त्रासामुळे त्याला आता त्या मार्गाला जायचं नव्हतं . त्यामुळे त्यांच्याशी तो तुटक वागत होता . पण त्या दिवशी 
" भाई प्रतिक काय झालं ती तुझ्यात इतका इंटरेस्ट दाखवत होती आणि तू तिला इतकं इग्नोर करतोय . " सौरव त्याचा खास मित्र झाला होता आणि जिमला दोघ सोबतच जायचे . त्यानं गेले काही दिवस नोटीस केलेली गोष्ट तो बोलून दाखवत होता . 
" देख भाई या मार्गावर जाऊन खूप त्रास सहन केलाय . जवळपास आयुष्यातून उठलो होतो . तिथून मुश्किलीने माघारी आलो आहे . आता परत ते नको . " त्याने स्पष्ट्पणे त्याला नकार दर्शविला . 
" अरे भाई ते प्रेम होत त्यात त्रास होतोच . पण न अडकता केलं कि मग त्रास होत नाही . " सुशांतने त्याला समजावलं . सुशांत नवीनच त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता . अगदी प्लेबॉय इमेज होती त्याची . 
" म्हणजे " काहीच न समजल्यामुळे प्रतिकने त्याला विचारलं . 
" सिम्पल भाषेत use and throw " सुशांतने उलगडा केला . 
" छे अरे स्वतःला माहित आहे कि ते किती त्रास होतो तो दुसऱ्याला देण्याची कल्पना नाही करवत . " प्रतीकला त्याची कल्पना अजिबात रुचली नव्हती . 
" अरे अजून त्रास होतो कि नाही ते आठवून ? " सुशांतने त्याला महत्वाचं विचारलं 
" हो होतो . " प्रतिक थोडा डिस्टर्ब् होत म्हणाला . 
" हा त्रास आयुष्यभर सहन करणार आहेस का ? अरे टेन्शन लेनेका नही देनेका तसच त्रास स्वतः नाही करून घ्यायचा . तो समोरच्याला ट्रान्सफर करायचा . मग बघ कस मोकळ मोकळ वाटत . " सुशांतने त्याला अजून स्पष्टीकरण देत सांगितलं . आता मात्र प्रतिक विचार करत होता ' खरंच असं असेल का ? '
" अरे टेक रिव्हेंज . जे एकीने केल आपल्यासोबत ते आपण अनेकजणी सोबत करायचं . " 
त्याच्या मनातही आता विचार पक्का होत होता . 
ती त्याच्यासमोर आली कि त्याच्यात हरवून जायची . आज परत तीला तो दिसला होता आणि ती तिच्या विश्वात हरवू लागली होती . तीने त्याच्याकडं पाहून स्माईल केली . इतर वेळी तो दुर्लक्ष करून निघून जायचा पण आज त्याने तिच्याकडे पाहून सहजच स्माईल केलं . तिला क्षणभर समजेनाच कि काय करावं . ती वेड्यासारखी त्याच्याकडं पाहतच राहिली . 
" काय ग काय असत एव्हढं येऊन सरळ बोलायचं ना " तो अगदी सहजपणे तिच्याशी संवाद साधत होता आणि ती मात्र त्याच्या डोळ्यात कुठं तरी हरवत चालली होती .

.... क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?