मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग ५)

मध्ये बरेच दिवस झाले तरी दोघांचं भेटणं झालं नव्हतं . त्याने थोडा विचार केला आणि तिला फोन लावला .
" कशी आहेस ? "
" मी ठीक आहे . तू कसा आहेस ? "
" कसा असणार ? "
" का काय झालं तुला ? "
" अगं किती दिवस झाले तुला भेटलो नाही . "
" पण तुला माहित आहे ना का ते . "
" अगं पण असं किती दिवस चालणार ? जर आपल्याला एकमेकांच्यात फ्युचर पाहायचं असेल तर पुढं जावच लागेल ना "
" हो खर आहे तुझ पण मला कम्फर्टेबल वाटत नाहीये तुला माहित आहे ना . "
" हो तेच म्हणतोय . अगदी लगेच ते नाही तसा विचार आपण आता नाही करू शकत . पण थोडं कॅम्फर्टेबल होऊया ना . त्यासाठी थोडं भेटूया बोलूया . "
" पण तू इथे कॅम्फरटेबल नसतोस आणि मी बाहेर नसते ... म्हणजे किमान सध्यातरी . "
" हो म्हणूनच मी विचार केला कि अगदी तुझ्या घरी ठीक नाही वाटत मला पण तुमचा एव्हढा मोठा परिसर आहे . तिथे फिरुया ना . "
" हे चालेल मला . "
" मग एक काम करतो आजच येतो मी . "
" नको आज नको . आपण उद्या भेटूया का प्लिज . "
" ओके चालेल . उद्या येतो मी . "
तो खुश होता . पण थोडं वाईटही वाटत होत कि आज नाही भेटता येणार . पण त्याने स्वतःची समजूत घातली त्याला काय होतंय इतके दिवस थांबलो आता एक दिवस थांबायला काय हरकत आहे . आणि अचानक त्याला काहीतरी क्लीक झालं त्याने कॅलेंडरमध्ये पाहून खात्री केली आणि त्याचा चेहरा परत उतरला . उद्या अमावस्या आहे . आणि आपण असा कसा मुहूर्त निवडला . हो पण....  पण हि गोष्ट तर आपण नाही ठरवली . मी तर आजच म्हणत होतो . उद्याच तर तिने सांगितलं .
' काय ती .... ' या विचारासरशी सर्रकन एक भीतीची शिरशिरी त्याच्या अंगातून निघाली . त्याने स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला . पण त्याला ते स्वतःलाच पटत नव्हतं . आपण एक काम करूया रात्र पडायच्या आत माघारी येऊ . नको रात्रीचा विचारच नको सकाळीच जाऊ आणि दुपारपर्यंत माघारी येऊ . संध्याकाळही नको व्हायला . हा विचार करून त्याला बर वाटलं .
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याने तिला फोन केला आणि आपण निघणार असल्याचं सांगितलं . किती वेळाची गोष्ट आता आपण तिला भेटणार या विचारात मश्गुल होऊन तो निघाला होता . आणि अचानक त्याची बाईक बंद पडली .
' छे काय वैताग आहे . हिला आताच बंद पडायचं होत . आणि त्या दिवशी गाडी बंद पडली म्हणून  त्यानंतर आपण तिचं पूर्ण सर्व्हिसिंग केलं होत . सगळं काम झालं होत . मग आज काय झालं अचानक . त्या दिवशी बाईक बंद पडली आणि काय पनवती लागली काय माहित . परत परत तेच होतंय . ' असा विचार त्याच्या मनात होता . पण आता गॅरेज शोधण्यावाचून पर्याय नव्हता . त्याला बराच वेळ गेल्यावर एक गॅरेज सापडलं . काम करणारा नवखाच असावा त्यामुळे त्याला बराच वेळ फॉल्ट सापडत नव्हता . शेवटी कसबस झालं त्याच . पण शेवटी तिथं त्याच काम व्हायला बराच वेळ गेला . आता तो तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता . इतका वेळ तिथं होता तिथं काही फोनला नेटवर्क मिळत नव्हतं त्यामुळं तिला काही सांगताही आलं नव्हतं . तो तिथून निघाल्यापासून वारंवार नेटवर्क चेक करत होता . शेवटी ते मिळालं त्याबरोबर त्याने तिला कॉल केला . ती वाट पाहून चिडली होती . पण त्याने झालेली सगळी हकीकत तिला सांगितली आणि आता आपण तिथे लगेच पोहचत आहोत तरी तू बाहेर येऊन थांब म्हणून सांगितलं . तिने होकार दिला आणि त्याने फोन ठेवला . आणि थोड्याच वेळात तो तिथे पोहोचला पण ती नव्हती तिथे . त्याला वाटलं ती परत आत गेली असेल म्हणून त्याने तिकडे जाऊन पाहिलं तर घराला लॉक होत . त्याने इकडे तिकडे पाहिलं पण ती कुठे दिसेना . त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तीचा फोनहि लागत नव्हता . तो तसाच तिला आसपास शोधत होता अचानक त्याला झुडपात काहीतरी हालचाल जाणवली . त्याला वाटलं बहुदा तीच असेल आणि आपली चेष्टा करत असेल म्हणून तो तिकडे गेला . तिथे काही दिसलं नाही मग तसाच पुढे पुढे निघाला . काहीतरी आसपासच असल्याची जाणीव त्याला होत होती . म्हणून तो पुढे पुढे जात राहिला . आता आसपासची झाडी चांगलीच दाट वाटत होती . कुणी लावलेल्या झाडांपेक्षा तो परिसर जंगली असल्यासारखा वाटत होता . अचानक त्याला जाणवलं तो खूप आत आला आहे आणि हे तर दाट जंगल आहे . त्याक्षणी त्याने माघारी जाण्याचा निर्णय घेतला आणि तो नजर समोर ठेऊनच एक दोन पाऊले मागे सरकला असेल तेव्हढ्यात तो कशाला तरी धडकला . त्याने चमकून मागे वळून पाहिले तर तीही त्याच्याकडे तशाच नजरेने पाहत होती .
" तू इथं कशी ? आणि काय करते आहेस ? "
" तू बोलावलं म्हणून मी बाहेर येऊन थांबले होते . तर काहीतरी जाणवलं म्हणून पाहायला इकडे आले आणि काय माहित कशी इतक्या आत येऊन पोहोचले . "
" माझही असच झालं . बर चल बाहेर जाऊ . " असं म्हणत तो तिला घेऊन बाहेर आला . ' काय विचार करून आलो होतो आणि इथं काय सुरु आहे . ' असा विचार तो करत होता . बर आता काही बोलण्याची इच्छाही नव्हती . पण तिला आधार देणं गरजेचं होत म्हणून तो तिला म्हणाला
" हे असं होत नेहमी ? "
" नाही आज पहिल्यांदाच झालं आहे . "
आता काही बोलावं तर ती घाबरेल म्हणून तो जास्त काही बोलला नाही आणि तिला घेऊन घरात आला . ती त्याला बिलगली होती . तो तिला घेऊन तसाच सोफ्यावर बसला . ती काही बोलत नव्हती . त्यानेही काही बोलायचं टाळलं आणि तो शांतपणे तिच्या केसातून हात फिरवत होता . हळूहळू ती शांत झाली . आता ती त्याच्या शर्टच्या बटनाशी खेळत होती . तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली
" आज जाऊ नकोस ना . आज इथेच थांब माझ्या सोबत . " हे बोलत बोलत तिने त्याच्या शर्टच बटन काढलं . आणि तिने आपला मोर्चा आता दुसऱ्या बटनाकडे वळवला . तिच्या मनात काय आहे हे त्याने जाणलं आणि त्याने तिचा हात पकडला आणि तिला तस करण्यापासून रोखलं . तिच्या डोळ्यात हळूहळू धुंदी उतरून आली होती . तिने त्याच्या हाताला हलकेच किस केलं . आणि त्याच्याकडे मादकपणे पाहू लागली . आता त्याचाही संयम ढळू लागला होता तरीही त्याने तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवला . पण तिने तो परत पकडला . आता त्यानेही तो सोडवण्याचा प्रयत्न केला नाही . हळूहळू दोघातलं अंतर कमी कमी होत होत . डोळ्यांनी एकमेकांना पिता पिता त्याच समाधान होत नव्हतं . त्यामुळे त्याचे ओठ त्याच्या मदतीला आले ते तिच्या ओठांचा मधुरस चाखु लागले . त्याचे हात तिच्या कमरेवरून फिरत होते . तिच्या पदराचं टोक त्याच्या हातात आलं . त्याने हळुवारपणे तिचा पदर तिच्या खांद्यावरून , छातीवरून दूर केला तो त्याच टोक पकडून हळूहळू बाकीची साडीही दूर करू लागला . आता साडी तिच्या अंगावर नव्हती ती होती त्याच्या हातात . त्याने ती बाजूला भिरकावली आणि तिला हळुवारपणे उचलून तो बेडरूमकडे निघाला . त्याने बेडरूमच दार उघडलं आणि आत प्रवेश केला . इथं ते दोघंच होते पण तरीही त्याने बेडरूमचा दरवाजा लोटला आणि आतून कडी लावली .

इथं ते दोघेच होते .... खरंच ??? ....

....... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर