मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग ३)

कितीवेळ तरी लाईट नव्हती केव्हातरी आली ती . मग तिने तिचा फोन चार्ज केला आणि त्याला फोन लावला .
" कसा आहेस ? "
" मी ठीक आहे . तुला मघाशी फोन केला होता तर तुझा फोन बंद लागला . "
" अरे किती वेळ लाईट नव्हती. आता आली . तेव्हा तुला फोन केला . "
" हे बघ माझं काम झालं आहे तू ये इकडे  "
त्याने एक पत्ता तिला मेसेज केला आणि त्या पत्त्यावर यायला सांगितल . ती वाटच पाहत होती यासाठी . त्यामुळे ती लगेच तयार झाली आणि निघाली . तिची गाडी पुलापाशी आली तर अजूनही पाणी वरून वाहत होत . पण तिला राहवत नव्हत त्यामुळे तिने तशीच गाडी पुढे नेली .
=======================================================
काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
    " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि अधाशीपणे त्याची चुंबनं घेऊ लागली . तो मात्र शांत स्थिर होता . ती मात्र अधीर होत होती . तिने त्याला घट्ट मिठी मारली होती . तिला ते असह्य झालं होत त्यामुळे तिने दोन्ही पाय उचलून त्यांनी त्याच्या कमरेला वेढा दिला होता . ती त्याला परत परत बेड कडे घेऊन जाण्याची आर्जव करत होती . 
त्यानेही तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली . तो तिच्या ओठांचं मुक्त प्राशन करत होता . ती अधीर होत होती व सातत्याने त्याच्यावर अधिकार गाजवू पाहत होती . पण त्याने सर्व कंट्रोल स्वतःकडे ठेवला होता . शेवटी तिने त्याच्या कलाने घ्यायला सुरुवात केली . 
ती पुढच्या प्रवासासाठी उत्सुक होती पण तो आधीच्या मुक्कामावरच रमला होता . तिला आता हे असह्य झालं होत . तरीही ती आहे त्याचा आस्वाद घेत होती . तिच्यासाठी हे नविन होत . पण हा वेगळा अनुभव ती एन्जॉय करत होती . तो शेजारच्या खुर्चीवर बसला ती त्याला गुंफलेलीच होती . त्याने चुंबन घ्यायच थांबवलं तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा तो त्याच्या हाताने दूर करू लागला . ती खूपच सुंदर भासत होती . तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि त्याची बोटं तिच्या केसांमध्ये गुंफली होती . ती हळुवारपणे तिच्या केसांमधून फिरत होती . त्याने तिला एक किस दिला आणि विचारलं 
" इतक सुंदर कस असू शकत कोणी ? "
ती लाजली आणि हलकेच हसून तिने त्याच्या छातीवर एक किस केला . 
तो हळुवारपणे तिच्यासोबत संवाद साधत होता . ती मुग्ध होऊन त्याच्या बोलण्यात गुंतली होती. 
" बर एक एक सांग ना पुलावर इतक पाणी होत मग तू कसा आलास ? "
" पुलावर तर अजूनही पाणी आहेच ना पण तू आलिसच ना . "
" आता पाणी कमी झाल आहे पण तू इतक्या पाण्यातून कसा आलास ? इतकी रिस्क का घेतली ? "
" अग काम होत त्यामुळे याव लागल . बर एक सांग तुला भीती नाही वाटत त्या तशा एकाकी बंगल्यात राहायला . "
" कसली भिती आणि कसल काय . "
" अग चोर वगेरे असतात . "
" त्याची नाही भीती वाटत आणि सेफ्टीसाठी मी गन बाळगते सोबत . "
" तुझ्या पहिल्या पतीचा मर्डर झाला होता ना . काय झाल होत ? "
" तेव्हा मी सिटीमधे आली होते आणि इथ काही कारणामुळे अडकून पडले होते घरी तो एकटाच होता . तिथे काय झाल काही माहीत नाही . पण माघारी गेले तोपर्यंत सगळ संपल होत . " 
" आणि आताही तू तिथे एकटी राहतेस त्यापेक्षा आपण इथ सिटीमधे आलो राहायला तर नाही का चालणार तुला . " 
" मला चालेल . सगळ चालेल . तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे . " 
" सो स्वीट ऑफ यू . पण मग आपण ती सगळी प्रॉपर्टी विकूया का ? "
" का ? असू दे ना . आपण राहू इथे पण कधीकधी जाऊ तिथे . सहज फिरायला म्हणून काय हरकत आहे . "
" हे बघ मला ते घर , ती जागा , तो सगळा परिसरच वेगळा , खूप विचित्र वाटतो . " 
" तू तिथ यायच्या आधी जंगलाच्या वाटेने आलास ना . म्हणतात त्या जंगलात वाईट आत्मांचा वावर आहे . तुझ्या डोक्यावर कुणाची सावली पडली का ? "
" तुझ आपल काहीही "
" मी आलो त्या जंगलातून आणि रस्ता  चुकून गेलेलो एका थोड्या विचित्र जागेवर . पण अस काही नाही . " 
" कुठ गेलेला तू . तिथे तर नाही जिथे एक खूप मोठ झाड आहे आणि त्याच्या आसपास फार विचित्र अर्धवट बांधलेल्या , अर्ध्या तुटलेल्या अनेक मूर्ती आहेत . " 
" हो . आणि तिथे एक जुन्या वाड्यासारख काही आहे ना . " 
ते ऐकून तिची चर्या एकदम बदलली . ती भीतीने थरथर कापत होती . आणि घाबरतच ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली . 
=========================================================
सगळ शांत वातावरणात सुरु होत . सगळे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आणि अचानक सर्वांच्या कानावर ती किंकाळी पडली ...... 
... क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?