मुख्य सामग्रीवर वगळा

Love u Ruku

" अरे मैं जाऊ के रुकु ? "
" रुकु~~~~ "
" अरे रुकु क्या बोलते सिधा रुको बोलो ना . "
" तुम जाओ फुफी . ओ तुमको नई बोले . ओ मेरेको बुलारिती . "
" ये लडकी का तो मैं क्या करू "
" तुम कूच मत करो खाली ये बोलो मुझे क्यू बुलाते "
" अरे वो शबनम के पास जाके आ तो "
" कायकू "

" जा बोले तो जानेका "
" जाके क्या बोलू "
" बोलना अम्मी का काम किये कि नही "
" क्या काम ? "
" वो तुम मत सोचो "
" क्या अम्मी सीक्रेट "
" हा सीक्रेट तू जा अब "

" रुकु "
" हाये तू जेव्हा माझं नाव घेतो ना खूप भारी वाटत . परत घे ना . "
" काय हे ? "
" ए प्लिज प्लिज "
" रुकु "
" हाय कानो मे शेहेद घोल दिया . माझं नाव तुझ्या तोंडून ऐकलं कि इतकं स्वीट वाटत कि काय सांगू . "
" तू आहेच इतकी स्वीट मग तुझं नावही स्वीटच ऐकू येणार ना "
" ऐक ना मला असं माझं नाव रोज रोज आणि सारखं सारखं ऐकावयास वाटत "
" मग बोलेन ना मी आपण भेटल्यावर रोज "
" असं नाही आता तुझ्यापासून नाही दूर जायचं . कायम आता तुझीच होऊन राहायचं आहे "
" मग आहेसच कि "
" तस नाही लग्न करून कायमची तुझी व्हायचं आहे "
" अगं अजून आपलं १८ पण पूर्ण नाही . लग्न कस करणार आहे आपण "
" आपण दोघंही तयार आहोत ना मग काय होतंय "
" तस कस एक वय असत त्याच्याशिवाय लग्न नाही करता येत "
" अरे ती कोण हा ती माधुरी नाही का तीच झालं कि लग्न तिचाही कुठं १८ पूर्ण आहे ?"
" अग पण तिचा नवरा तर मोठा आहे ना "
" आणि तुला तर १ वर्षच कमी आहे पण मला तर २१ "
" ए मी नाही हा थांबणार इतकी "
" हो का ? बर आणि यासाठीच का एव्हढी लवकर बाहेर पडलीस "
" नई वो ... अल्ला मैं तो भूलच गई वो अम्मीने .... "
 एव्हढं म्हणत ती पळालीसुद्धा
काय हि . मधेच बोलते काय . मधेच पळून जाते काय ? वेडी आहे खरंच आणि याच वेडावर तर जीव ओवाळून टाकावासा वाटतो Love you Ruku ....!!!!

....क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "