मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिची कहाणी

     आज आसपास सगळं कस शांत आहे . पण एक वेळ होती जेव्हा असं नव्हतं.      " बाजूला हो. त्याने एका हातानं तिला ढकललं . त्याच्या ताकतीसमोर तिचा काय निभाव लागणार होता, ती धडपडत खाली पडली. आज तो भलताच पिला होता व परत दारू पिण्यासाठी निघाला होता . त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता . काहीतरी अघटित होईल म्हणून ती त्याला अडवत होती . पण त्या अवस्थेतही तो तिला आवारत नव्हता . ती परत उठली आणि त्याला विनवू लागली . पण तो तीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . पण ती प्रतिकार करतच होती . शेवटी त्याने तिला परत खाली पाडलं आणि एक जोरदार लाथ मारली. ती तिच्या पोटात बसली. असह्य वेदना होऊन ती तशीच तळमळत पडली. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याने तशाच आणखी चार-पाच लाथा तिला मारल्या. ती अंग मुडपून लाथ पोटात बसणार नाही याचा प्रयत्न करत होती. पण तरीही ते तिला सहन होत नव्हतं. तिला एव्हढं मारून झाल्यावर त्याच समाधान झालं असावं. तो तळमळत पडलेल्या उमाला ओलांडून बाहेर पडला . =============================================================    " काय करताय मी मरमर मरतेय आणि कशीबशी पोरांना दोन घास भरवू बघतेय