मुख्य सामग्रीवर वगळा

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आपण आत जाऊन पाहूया . मुख्य दरवाजा काहीसा उघडाच होता त्याने तो ढकलला . आणि आत गेला आत सगळं अस्ताव्यस्त पडलं होत . खिडक्यांवर आतून लाकडी पट्ट्या वगेरे लावल्या होत्या त्यावर जळमट आणि धूळ यामुळं बाहेरून फारसा उजेडही येत नव्हता . त्या अंधुक उजेडातच तो इकडून तिकडे फिरत होता . अचानक तो कशाला तरी अडखळला आणि जवळ जवळ पडता पडता वाचला . त्याने त्या तशा अंधुक प्रकाशात काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला पण ठीक दिसत नव्हतं पण मानवी आकृती असल्यासारखं वाटलं . इथं इतक्या अडचणीत कुणी माणूस पडलं आहे . कस शक्य आहे असा तो विचार करतच होता इतक्यात भीतीची शिरशिरी त्याच्या अंगातून उमटली . ते डोळे जणू दगड झालेले कुणा जिवंत माणसाचे असू शकत नाहीत . तो खूपच घाबरला . पटकन मागे सरकण्याचा  प्रयत्न केला आणि तोल जाऊन तो पडला . एखादा दरवाजा असावा ज्यातून तो आत पडला होता . आणि तिथून पुढे जिना असावा ज्यामुळे तो धडपडत कितीतरी पायऱ्या खाली येऊन पडला होता . त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर एक कळ त्याच्या पायातून निघाली . खूप जोराचा मार लागला असावा पायाला इतका कि हाड पण मोडलेले असू शकत . त्याने पडल्या-पडल्या  कुशीवर होण्याचा प्रयत्न केला तशी पाठीतुनही एक कळ जाणवली . पाठीलाही बराच मार लागला असावा . तो काही वेळ तसाच पडून राहिला .थोडस दुखणं थांबलं कि पुढचा विचार करता येईल असा त्याचा विचार होता . पडल्या-पडल्या तो आठवू लागला कि आपण काय करत होतो आणि इथे कुठे येऊन पडलो .

आपण तसा कुणाचा सल्ला या बाबतीत घेत नाही पण आज घेतला . त्या सोरावला तर आत्ता-आत्ताच ओळखू लागलो आहे आणि त्याने काय सल्ला द्यावा  ... जबरदस्ती . छे आपल्याला अशी गरजच कधी पडली नव्हती पण आता गोष्ट स्वतःच्या इगोची झाली होती त्यामुळं आपण त्यासाठी तयार झालो . मग प्रियाला उगाचच काहीतरी थाप मारून सोबत यायला तयार केलं . पण ती स्वतःची गाडी घेण्यावर अडली त्यामुळं गाडीचा कंट्रोल आपल्या हाती नव्हता . पण शेवटी तिथे पोहोचल्यावर ती काही करू शकणार नव्हती . मग सहज म्हणून पडलो आणि कसली गाढ झोप लागली . इतकी गाढ झोप तीही कारमध्ये आली नव्हती . मग जाग आल्यावर पाहतो तर कार रस्त्यापासून कुठंतरी दूर या आडबाजूच्या ठिकाणी उभी आहे . गाडीत मी एकटाच प्रिया गायब आहे . मग मी बाहेर येतो . दुरवर हा बंगला दिसतो . इथे कुणाचातरी वावर जाणवतो आणि जेव्हा इथे येतो तर इथे कुणीच नाही आणि ते कोण ज्याला अडखळलो . कुणी झोपलेलं , बेशुद्ध पडलेलं कि ... ते डोळे आठवून ... कि कुणाचं प्रेत होत ते . त्याला घाबरून पाठीमागं सरकलो . त्या दरवाज्यातून आत पडलो . एकदम त्या जिन्यातून गडगडाट खाली . जिन्यातुनच तर खाली पडलो पायाला आणि पाठीला इतकं कस लागलं . हळू पडलो का ? लागलं असेल असा विचार करून त्याने परत उठण्याचा विचार केला पण त्याला जाणवलं तो चांगलाच जायबंदी झाला आहे आणि आता कुणाच्यातरी मदती शिवाय याच्यातून बाहेर पडण अवघड आहे . तो विचार मनात चमकताच त्याने इतर सगळ्या शंकाकुशंका बाजूला ठेऊन मदतीसाठी आवाज देण्याचा विचार केला आणि इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली . तो इतका जायबंदी झाला होता कि वळून काय आहे तेही पाहू शकत नव्हता . तो तसाच पडून राहिला आणि त्याला जाणवलं ते जे काही आहे ते हळूहळू त्याच्याच दिशेने येत आहे पण तो काहीही करू शकत नव्हता . आणि अचानक त्याच्यात खांद्यावर कुणाचा तरी हात पडला . त्या तशा स्थितीतही त्याने दूर जाण्याचा प्रयत्न केला . फक्त प्रयत्न तो कुठ जाऊ शकला नाही पण त्या प्रयत्नात त्याची पाठ आणि त्याचा पाय मात्र असह्य वेदना देऊ लागला . त्याला ती वेदना सहन होईना . त्याने ती वेदना सहन होत नसल्याने डोळे मिटून घेतले आणि अचानक त्याला त्याच्या डोळ्यासमोर उजेड जाणवला . त्याने डोळे उघडले समोर खरंच उजेड होता आणि कुणीतरी त्याच्या समोर आलं .
" अजित तू ? "
" क्या भाई तू एवढा मोठा प्लेअर . आणि तू स्वतः अडकला . "
तो काही बोलणार इतक्यात प्रिया तिथे आली .
" प्रिया कुठं होतीस तू ? आणि हे सगळं काय आहे ? "
" अजूनही समजलं नाही तुला . तू तर एक्सपर्ट आहेस ना सावज जाळ्यात अडकवण्यात . तसंच हे . ट्रॅप आहे हा ट्रॅप आणि तू पुरता अडकला आहेस यात "
" मला कळेल असं सांगशील का काही "
" ठीक आहे ऐक तर मग . किती मुलींना तू जाळ्यात ओढलंस आणि वापरून सोडून दिलास . त्यांचं पुढे काय झालं काय नाही काही माहित आहे का तुला ? "
तो फक्त तिच्याकडे पाहत होता .
" दीपाली आठवते का तुला ? "
त्याने क्षणभर ते नावं आठवण्याचा प्रयत्न केला पण छे कोण होती काय माहित .
" माझी बहीण होती . अगदी साधी सरळ . कशी तुझ्या जाळ्यात अडकली आणि आयुष्याची माती करून बसली . मग ठरवलं तुला सोडायचं नाही . तुला अशी शिक्षा द्यायची कि तूच काय तुझा आत्मा सुद्धा शहारला हवा . म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं . आधी अजित मग मी तुझ्या आयुष्यात आलो . तू तेच केलस जे आम्हाला अपेक्षित होत आणि स्वतःहून यात अडकून बसलास . आता उरलेलं आयुष्य इथेच खितपत पड मरणाची वाट बघत . "
एव्हढं म्हणून ती दोघे निघाली .
तो विचार करत होता . कोण हि दीपाली आठवत पण नाहीय . काय यार कुणामुळे हे होतंय ते सुद्धा माहित नाही . छे तेव्हढं कळलं असत तरी पुरे आणि आयुष्याची माती केली म्हणजे मेली कि अजून काही . छे आपल्या सोबत वाईट होणार हे तर माहीतच होत . हा हळूहळू होणार मृत्यू तर सहन होईल . पण या सस्पेन्स मध्ये सोडायला नको होत . त्याचाच जास्त त्रास होतो आहे .
तेव्हढ्यात काहीतरी ठोकल्याचा आवाज आला.  बराच वेळ येत होता . बहुदा मुख्य दरवाज्यालाही बाहेरून आडव्या तिरक्या फळ्या लावल्या जात होत्या . आता आतून बाहेर जाण अशक्य . ठीक आहे पण जाताना उजेड तरी ठेवायचा . या अंधारात तर काही समजतही नाही . काय कसले कसले आवाज येत आहेत ....

( संपूर्ण ...... खरंच ????)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर