मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग १)

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .
     तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
============================================================

" करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ... "
" स्वतःचा जीवही " त्याचा हात काहीतरी शोधात होता .
============================================================

" Excuse me . " तिने वळून पाहिलं .
" माझी गाडी बंद पडली आहे . आणि फोनची बॅटरीसुद्धा संपली आहे . मला एक फोन करायचा होता . "
" Sure " असं म्हणत तिने त्याला घरात बोलावलं . चांगलाच प्रशस्त हॉल होता तो . खानदानी श्रीमंती जाणवत होती त्या सगळ्या वास्तूत . "
त्याचा फोन झाला आणि तो आभार मानून जाऊ लागला .
" बाहेर अजूनही पाऊस आहे , गाडीही बंद आहे . कुठ जाणार आहे ? "
" नाही मित्राला फोन केला . तो म्हणाला येतो म्हणून . "
" तो नाही येणार . " त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं
" का ? "
तिने त्याच्याकडं एकदा पाहिलं आणि त्याच्या प्रश्नाच उत्तर न देता त्यालाच विचारलं
" कधी बाहेर पडला आहेस ? "
"  दुपारी निघालो होतो . जरा जंगलाच्या बाजूने जाऊन यावं म्हणून तिकडे गेलो आणि मग त्या तिकडच्या नेहमी गर्दी नसते त्या रस्त्याने इकडे यायला निघालो मधे थोडी वाटही चुकलो त्यामुळ तासाभरात पोहोचायचं ते आता पोहोचतोय इथे . इथून पुढे काय अर्धा तासात पोहोचलो असतो सिटीमधे पण गाडी बंद पडली . जवळपास कुठल दुकान पण नव्हतं . मग थोडा इकडे तिकडे फिरलो तेव्हा तुमचा बंगला दिसला . "
" तुझी गाडी बंद जरी नसती पडली तरी सिटी मधे नसता जाऊ शकला असतास तू . "
ती स्पष्ट असं काही सांगत नव्हती . तिचं वागणं आणि बोलणं फार रहस्यमय वाटत होत त्याला .
" का ? " त्याने प्रश्न केला .
" ब्रिजवर पाणी आल आहे आणि वाहतूक बंद झाली आहे . "
" Oh Shit ! "
" काही इशू नाही तू थांब इथेच . सकाळपर्यंत पाणीही ओसरेल मग तू जाऊ शकतोस . "
" Oh, Thank you . " त्याच टेन्शन बरच कमी झालं होत .
" बर तू काही घेणार का ? " तिने त्याची विचारपूस केली .
" हा असा मौसम आणि या मधे... " त्याने मधेच थांबत मनातली गोष्ट टाळली .
" काय ? "
" एक कप चहा "
" तू चहा पिणार आहेस ? "
" हो , म्हणजे ... "
" ठीक आहे . बस तू . be comfortable . मी आलेच . " असं म्हणून ती गेली . आणि थोड्याच वेळात ती वाईन घेऊन आली आणि तिने तो ट्रे त्याच्यासमोर ठेवला .
" हे काय तुम्ही वाईन घेऊन आलात ? "
" हेच योग्य आहे ना या वातावरणात ? "
" Actually हो . पण तुम्हाला कस बोलू म्हणून ... "
" But I get that "
" हे कोण घेतं ? "
" माझे मिस्टर ..."
" I must say he is a lucky guy "
" He was . He is no more now . "
त्याला एकदम धक्काच बसला . त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि विचारलं
" काय झालं ? "
" He was murdered "
" Oh Sorry . मी तुम्हाला दुखावलं . "
" असू दे "
" पण मग तुम्ही इथे एकट्या राहता या अशा आडबाजूच्या बंगल्यामधे ? "
" हो . का ? "
" काही नाही जस्ट विचारलं . "
" आणि हे कधी झालं ? "
" महिना झाला "
" तुम्ही पुढे काय विचार केला आहे ? "
" कशाचा ? "
" स्वतःच्या फ्यूचरचा . "
" अजून नाही केला . "
" तुला काय वाटतय मी काय करावं ? "
" तुम्ही दुसरा जोडीदार शोधा . आयुष्य असच कस काढाल ? "
ती हसली " कोण करेल माझ्याशी लग्न ? "
" तुम्ही दिसायला सुंदर आहात कोणीही करेल "
" कोणीही ? "
" हो कोणीही "
" तू करशील ? "
" मी ? "
" का ? "
तिच्या या प्रश्नाने त्याला काही क्षण काही सुचलंच नाही पण लगेच त्याने स्वतःला सावरल
" I would love to . पण काय आहे अजून मी सेटल झालो नाही . मला तुझी जवाबदारी घ्यावी लागेल ना . "
" काय गरज आहे त्याची ? हा बंगला, आणि हि पाठीमागे पसरलेली सगळी प्रॉपर्टी माझी आहे . "
" so... "
" so don't think much and just enjoy this moment "

     तिने त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतः सोबत घेऊन निघाली . wine ची मादकता तिच्या डोळ्यात उतरली होती . त्यालाही तिच्या डोळ्यात उतरून ती मादकता अनुभवायची होती . तिने दरवाजा उघडला . त्याच लक्ष आत गेलं . रोमँटिक मूड ला आणखीनच रोमँटिक करणार वातावरण होत ते . ते मंद जळणारे दिवे तो , प्रशस्त बेड , त्या रेशमी बेडशीट्स . ती त्याला आत घेऊन आली . त्याच्यासाठी हे सारं स्वप्नवतच होत . तिने त्याला बेडवर बसवल . काहीही झाल तरी तो तिच्यासमोर नवखाच होता . त्या वातावरणाची मोहिनी त्याच्यावर पडली होती . तो तिला मुग्ध होऊन पाहत होता . आता तिला कवेत घ्यावं या भावनेनं त्यानं तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला . तशी ती हळूच त्याच्यापासून दूर झाली आणि " मी आलेच " म्हणत ती कुठेतरी गेली . त्याने सभोवार नजर फिरवली . ते वातावरण खरच त्याच्यावर मोहिनी घालत होत . तो आसपास पाहत होता तेव्हड्यात ती आली .  फार वेळ न लावता ती छान तयार होऊन आली होती . तिने हलकासा शॉवर घेतला होता , मोहक आणि मंद असा परफ्युम तिने मारला होता आणि जो ड्रेस परिधान केला होता तो त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता . त्याने तिचा हात हातात घेतला व तिला स्वतःकडे ओढलं . ती जवळ येताच त्याने तिला कवेत घेतल . तिचा गंध त्याच्या रोमारोमात संचारत होता . तो क्षणभर तिला दूर करून न्याहाळू लागला . तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता .
===========================================================

रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . ती हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली . आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात बोलली
" मला अशी अधुरी नको ना सोडूस . चल ना . " म्हणत ती आर्जव करत होती .
===========================================================

काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
    " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि अधाशीपणे त्याची चुंबनं घेऊ लागली . तो मात्र शांत स्थिर होता . ती मात्र अधीर होत होती . तिने त्याला घट्ट मिठी मारली होती . तिला ते असह्य झालं होत त्यामुळे तिने दोन्ही पाय उचलून त्यांनी त्याच्या कमरेला वेढा दिला होता . ती त्याला परत परत बेड कडे घेऊन जाण्याची आर्जव करत होती . 
...क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क ....

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आप...