मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्याय

" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . " अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं . " तू कधी आणि कशी पहिली " " अग  लाल  दिसतायत कि गाल  " " ते होय " " का तुला काय वाटलं  ? " " काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? " " अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? " " नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली " नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही