मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावज (भाग ४)

सगळ शांत वातावरणात सुरु होत . सगळे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आणि अचानक सर्वांच्या कानावर ती किंकाळी पडली ......  काऊंटर जवळचा सगळा स्टाफ , आलेले कस्टमर सगळे तिकडे धावले .  अशा वेळी सभ्यता किंवा पाळण्यात अर्थ नव्हता त्यामुळे  मॅनेजरने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवला . एक क्षण तो उघडला गेला नाही तोपर्यंत कुणाच्याही जीवात जीव नव्हता . काय झालं असेल याची चिंता आणि उत्सुकता दोन्ही होती . दरवाजा उघडला गेला .  " काय झालं सर , मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला . "मॅनेजरने विचारलं .  " काय तुमचं हॉटेल आहे इतके चार्जेस घेता आणि काय प्रकार आहे इथं ? " तो गुश्यातच बोलला .  मॅनेजरला काय समजत नव्हतं . त्याने परत अदबीनं विचारलं  " सर काय झालं ते तरी सांगा ? " " काय काय इथे पाल पडली तिच्या अंगावर . काय रूम्स आहेत या ? पाली काय झुरळ काय काही पेस्ट कंट्रोल वगैरे काही करता कि नाही ? " तो चांगलाच चिडला होता .  मॅनेजरने जरा आसपास पाहिलं . सोबत स्टाफ आणि दुसरे कस्टमर पण होते त्याने हॉटेल स्टाफ ला खाली काऊंटरपाशी कोणी तिथे जायला सांगितलं . सोबत दुसऱ्या कस्टमरलाही घेऊन

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आपण आत जाऊन पाहूया .