मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात जोरात आघात झाला ... 
=============================================================
त्याला हळूहळू शुद्ध येत होती . त्याने डोळे उघडले आणि सभोवार पाहिलं . थोड्या वेळात उजाडेल असं दिसत होत . आणि तो रस्त्याच्या कडेला पडला होता . त्याने चेक केलं आपण खरंच जिवंत आहोत . खूप मोठी गोष्ट होती ही . पण मग ते काय होत जे काल झालं . असू दे जे काय होत ते आता त्याचा विचार करण्याचा वेळ नव्हता . लवकरात लवकर त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं होत . तो उठला तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि कालच्या धडपडीत आपण बिना कपड्याचेच बाहेर पडलो आणि आता अशा अवस्थेत कुठं कस जावं हा प्रश्न होता आणि काही वेळातच उजाडणार होत . पण कालच्या गोष्टींची भीती मनात असल्यामुळे त्याने तसंच निघायचं ठरवलं . तो रस्त्याने निघाला होता काही अंतरावर त्याला एक झोपडीवजा घर दिसलं . तिथे बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले होते त्याने ते घातले आणि तो निघाला . थोडे टाइट होते पण या परिस्थितीत त्याला ते फार उपयोगी पडले होते . मग त्याने विचार केला आपण नक्की कुठल्या रस्त्यावर आहोत हेही समजत नाही . काल त्या अंधारात कस आणि कुठं आलो तेच समजत नव्हतं . पण तरीही त्याने चालत राहायचं ठरवलं . कितीतरी वेळ तो चालत होता पण कुठं काही ओळखीची खूण किंवा वस्ती दिसत नव्हती . मग त्याच्या मनात आलं मघाशी त्या झोपडीतल्या लोकांना विचारलं असत तर बर झालं असत . माघारी त्या झोपडीकडे जावं असं त्याला वाटून गेलं . पण मग प्रश्न होता कपड्याचा . मग त्याने तो विचार झटकून पुढं चालत राहायचं ठरवलं .

इकडे तिलाही जाग आली . तिने सभोवार पाहिलं सगळं अस्ताव्यस्त पडलं होत . तिचे कपडेही आसपास पडले होते . ती स्वतःला आरश्यात पाहू लागली चेहऱ्यावर , हातापायावर रक्त होत , केस विस्कटले होते . तिने बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेतला . त्या पाण्यात अंगावरच रक्त निघून चाललं होत . डोक्यात पाठीमागच्या बाजूला फार दुखत होत . तिने हाताने चाचपडत पाहिलं , तिथे चांगलीच जखम होती . ती शॉवर घेऊन बाहेर आली स्वतःच व्यवस्थित आवरून ती रूम आवरू लागली . काही वेळात सगळं जागच्या जागी होत . तिने कॉफी बनवली आणि बाहेर झोक्यावर बसून शांतपणे ती कॉफीचा स्वाद घेऊ लागली .

बराच वेळ चालल्यावर त्याच्या लक्षात आलं कि आपण बऱ्यापैकी जंगलात आले आहोत . एकतर सकाळपासून पोटात काही नव्हतं पण फक्त भीतीमुळे तो चालत होता . पण आता त्याचा धीर सुटत चालला होता . क्षणभर तो थांबला आणि विचार करू लागला . आपण सकाळपासून चालत आहोत तरीही इथे ना कोणती वस्ती आहे ना शहराकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्याचा मागमूस . अजून काही वेळ जर असच चालत राहिलो तर अंधार होईल आणि पुढे तर दिसत आहे घनदाट जंगल . आता पुढे जाणे म्हणजे मूर्खपणा ठरेल म्हणून नाईलाजानं त्यानं माघारी वळायचं ठरवलं . पोटातली भूक आणि चालून आलेला थकवा यामुळं त्याच डोकं जड झालं होत . पण तरीही तो पाय उचलत होता . आता अंधार पडला होता आणि आसपासच्या झाडीतून वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले होते . त्याच काळीज धडधडत होत . एव्हढ्या मुश्किलीने आपण काल वाचलो आणि आज परत त्याच दिशेने निघालो आहोत याच त्याला कधीकधी नवल वाटत होत पण असं उपाशी , या जंगली जनावरांकडून मारलं जाण्यापेक्षा तिथं जाऊन आपला रस्ता शोधायचा परत प्रयत्न करू . गाडी सोबत असती तर हा प्रश्नच आला नसता एव्हाना निवांत घरी पोहोचलो असतो . तिथून जाणारच आहे तर गाडीची चावी शोधावी का असही त्याच्या मनात येत होत . ती जिवंत असेल का मेली असेल काय माहित . पण परत गेल्यावर तिने जशी झडप त्याच्यावर टाकली होती ते आठवून मात्र त्याचे पाय क्षणभर थबकले . पण मनाचा हिय्या करून तो चालतच राहिला .

आपण बेशुद्ध पडलो ते हेच ठिकाण असावं . अंधारात दिसत तर काही नव्हतं पण त्याला मनातून असं नक्की वाटत होत . तो तसाच पुढे निघाला . आता बहुदा तो त्या बंगल्याच्या परिसरात आला होता . अचानक वारा वाहायचा थांबला . सगळे आवाज बंद झाले . सगळीकडे एक भेसूर शांतता पसरून राहिली होती . तो चालतच होता आणि अचानक शेजारच्या गवतात काहीतरी खुसफूस झाली . तो थबकला तिकडे पाहू लागला पण काही होत नाही हे पाहून त्याने चालायला सुरुवात केली . तसा तो आवाज परत आला . तो जसजसा पुढे जात होता तस तस रस्त्याला समांतर गवतामधून तो आवाज येत होता . असं वाटत होत जणू एखाद जनावर त्यातून जात आहे किंवा त्याचाच पाठलाग करत आहे . त्याला काय करावं सुचत नव्हतं त्याने चालण्याचा वेग वाढवला तसा तो आवाजही त्याच गतीनं पुढं सरकत असल्याचं त्याला जाणवलं . त्याचा घसा कोरडा पडला होता . पण त्याच्यापुढं आता चालण्याशिवाय पर्याय नव्हता . तो त्या आवाजाकडे लक्ष ठेवत रस्त्याने निघाला होता . पुढे रस्ता डावीकडे वळत होता आणि या भागात गवत जास्तच दाट आणि उंच होत . आता त्याला डावीकडे वळावं लागत होत ज्यामुळे तो गवतातून येणारा आवाज जवळ जवळ येऊ लागला बहुदा ते जे काय होत ते रस्त्यावर येत होत . तो घाबरला त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण तो कशाला तरी अडखळला आणि पडला आणि त्याच वेळी शेजारच्या गवतातून ते प्रचंड वेगानं त्याच्या दिशेनं आलं त्याने भीतीने डोळे बंद करून घेतले आणि तो आवाज अगदी त्याच्या जवळून गेला . परत गवतात खुसपूस झाली . त्याने डोळे उघडले . ते जे काही होत ते अगदी त्याच्या शेजारून निघून पलीकडच्या बाजूला गवतात गेलं होत . तो सगळा जोर लावून उठला आणि अंगातली होती नव्हती ती शक्ती लावून धावू लागला . किती वेळ धावत होता काय माहित . पण बहुदा आता तो बंगल्याच्या अगदी जवळ येऊन पोचला होता . इथून त्याला लवकरात लवकर जायचं होत पण पळून पळून त्याला धाप लागली होती . त्याचा श्वास वरखाली होत होता . शेवटी त्यानं ठरवलं काही वेळ इथंच आराम करू आणि मग भरभर तिथून निघून जाता येईल .  तो तसाच तिथे रस्त्यावरच बसला . हळूहळू त्याचा श्वास सामान्य होत चालला होता . आता त्याला बर वाटू लागलं होत . तो उठला . आता इथून न थांबता शक्य होईल तितकं वेगानं आणि शक्य असेल तितकं दूर जायचं असं त्यानं ठरवलं . तो दोन-चार पावलच चालला असेल इतक्यात त्याची नजर समोर गेली . भीतीने त्याची दातखिळी बसायची बाकी होती . तो रस्त्याच्या मधोमध उभा होता आणि त्याच्यापासून काही पावलावर अगदी त्याच्या समोर ती उभी होती ......

..... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

सावज (भाग ३)

कितीवेळ तरी लाईट नव्हती केव्हातरी आली ती . मग तिने तिचा फोन चार्ज केला आणि त्याला फोन लावला . " कसा आहेस ? " " मी ठीक आहे . तुला मघाशी फोन केला होता तर तुझा फोन बंद लागला . " " अरे किती वेळ लाईट नव्हती. आता आली . तेव्हा तुला फोन केला . " " हे बघ माझं काम झालं आहे तू ये इकडे  " त्याने एक पत्ता तिला मेसेज केला आणि त्या पत्त्यावर यायला सांगितल . ती वाटच पाहत होती यासाठी . त्यामुळे ती लगेच तयार झाली आणि निघाली . तिची गाडी पुलापाशी आली तर अजूनही पाणी वरून वाहत होत . पण तिला राहवत नव्हत त्यामुळे तिने तशीच गाडी पुढे नेली . ======================================================= काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.     " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जा