मुख्य सामग्रीवर वगळा

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार करू शकतो अशा विषयातही .

आयुष्यात इतक्या मुली आल्या , किती वेळा रिलेशनमध्ये होतो . पण प्रेम फक्त एकीवरच होत . गुंतलो फक्त तिच्यातच आणि त्रास झाला तोही फक्त तिच्यापासून दूर जाऊनच आणि हा त्रास विसरण्यासाठी हे सगळं केलं पण काय झालं आजही तिची आठवण येते आणि परत तोच त्रास होतो . कितीतरी वेळा वाटत याच्यापेक्षा कुठंतरी जाऊन जीव द्यावा . का असत असं आजपर्यंत इतक्या मुली आपल्याला मिळाल्या पण जी खरंच मनापासून हवी होती तीच नाही मिळाली . लोकांना वाटत कि किती भारी लाईफ आहे आपलं पण त्यांना कुठे माहित आहे इथे फक्त शरीरसुख मिळतंय . मनाच सुख मनाच समाधान कधीच नाही मिळत . शरीरालापण सवय झालीय आता नेहमी नवीन हवं . कुणी कितीही भारी असली तरी फारकाळ एकी सोबतच रिलेशन ठेवायला नको वाटत , तिटकारा वाटतो . आयुष्य भुंग्यासारखं झालं आहे . आज या फुलावर उद्या त्या फुलावर . भुंगा ... भ्रमर . फक्त बोलण्यावर भुरळ पडणारा शब्दभ्रमर ....

काय पण एक एक पोरी असतात , ती परवा एक भेटलेली . तिला तर अगदी क्षण आणि क्षण काय अगदी शब्द न शब्द आठवतोय माझ्या सोबतचा . आणि मला , मला तर तीच नाव आठवत होत ना चेहरा . कशी दिसत होती आपण खरंच हिच्यासोबत ? नाही, वाटत तर नाही . पण काय माहित आधी बरी दिसत असेल . काय माहित . आता आपल्याला वेळ तरी कुठं असतो अशा लोकांचा विचार करायला . आता मी सिलेक्टिव्हच निवडतो . माझी नेक्स्ट टार्गेट प्रिया . क्या बात है अशा मुलींसाठी काही करण्यात अर्थ आहे . बाकी कुणाचा कशाला विचार करायचा .

प्रिया एखादी मॉडेल तयार होऊनपण जितकी सुंदर नाही दिसणार तितकी हि झोपेतून उठलीतरी दिसेल . सचमे इसे रबने फुरसतसे बनाया होगा . तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता पण ती त्याच्याकडे लक्षच देत नव्हती . त्याचे सगळे प्लॅन्स , सगळे टोटके काही काही कामाला येत नव्हतं . हि आहेच खास तर हिच्यासाठी उपायपण खासच हवा ना . त्याने बराच विचार केला आणि त्याने एक कॉल लावला . त्याला अपेक्षा होती ती काही फार जास्त प्रमाणात पूर्ण झाल्यासारखी वाटत नव्हती पण तरीही तो मनात म्हणाला
' हवं तेव्हढं तर हे कामाचं वाटत नाही पण आता दुसरं काही नाही तर यही सही तो यशी सही .

" हे बघ पटकन बोल मला वेळ नाही " प्रिया जवळपास त्याला उडवून लावतच म्हणाली . त्याला खरतर तिचा राग आला होता पण आता तो त्याने गिळला आणि तिला समजावून सांगू लागला . शेवटी तिच्यावर काही प्रभाव पडतो आहे असं त्याला जाणवलं .
" ओके खरंच हे इतकच गरजेचं असेल तर ठीक आहे . "
तिचा होकार मिळाला होता . आता त्याची पुढची योजना तयार होती . तस तर हे त्याच्या तत्वात बसत नव्हत पण त्याला आता इथून हार मान्य नव्हती .

त्याने तिला स्वतःच्या गाडीत यायला सांगितलं पण तिचं म्हणणं होत कि तिची स्वतःची गाडी आहे आणि ती अशी इथे सोडून ती परत घेणे तिला अवघड जाईल त्यापेक्षा त्यानेच त्याची गाडी सोडून तिच्यासोबत यावं . हे थोडं अवघड होत होत पण आता पर्याय नव्हता आणि त्यांनी दुसरं काही म्हणण्याचा प्रयत्न केला असता तर तिला त्याचा संशय आला असता . म्हणून तो तिच्या सोबत तिच्या गाडीत जायला तयार झाला . ती पुढे बघून गाडी चालवत होती आणि त्याच्या मनात पुढल्या गोष्टी रुंजी घालत होत्या .

... क्रमशः





   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क ....

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आप...