मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो . " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . " " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . " " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . " " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . " " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . " तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली . वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम तिच्या अंगावर स्प्रे केला . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर