मुख्य सामग्रीवर वगळा

पर्याय

" अशी जवळ ये ना "
नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला ....
" आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही .
" अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं "
छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली .


" अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं .
" तू कधी आणि कशी पहिली "
" अग लाल दिसतायत कि गाल  "
" ते होय "
" का तुला काय वाटलं  ? "
" काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? "
" अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? "
" नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली
" नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही नव्हतं
" त्याला पाहिलस का ? " रुपाली स्वतःत मग्न राहून बोलली .
" अशी का त्याच्या माग फिरतेय ?  चांगलं दिसत का ते ? आणि पोरांची डोकी काय सरळ असतात का ? "
" त्यांचं त्यांना माहित पण इथं माझं डोकं कुठं थाऱ्यावर आहे "
" का ग काय झालं " शमान काळजीनं तिला विचारलं पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती . ती तशीच पुढे निघाली . तेव्हढ्यात प्रणवने तिचा हात पकडला व तोंडावर बोट ठेऊन तिला न बोलायची खूण केली व तो तिला कुठेतरी घेऊन जाऊ पाहत होता  .
" हात सोड माझा " तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा हात सोडला नाही .
" तोंड बंद कर आणि ऐक काय बोलतायत ते " तिनेही तिकडे लक्ष दिल .

" अरे तिला नुसतं फिरवायच आपली जान तर आशा आहे " :- राहुल
" अरे ती आशा आणि हि कोण निराशा ? " :- सतीश
" नाही ती आशी आणि हि आधाशी ; जगाला माहित आहे माझं, तरी आहे माझ्या माग मग  का सोडू .  हो तर नाही म्हणायचं पण नाही पण नाही म्हणायचं राहतेय तोपर्यंत राहू दे सोबत " :- राहुल
" पुढे काय use and throw " त्याच वाक्य कुणीतरी पूर्ण केलं .
त्यांच्यात हशा पिकला . ते एकमेकांना टाळ्या देत होते .
तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होत तिच्या भावनांची अशी चेष्टा तिला सहन झाली नाही आणि ती तिथून तडक निघाली .
" तुला काय वाटलं तो नाही तर तुला चान्स आहे ? " तिला राग आला होता राहुलचा पण समोर असलेल्या प्रणववर तो निघत होता .
" माझं असं काही नाही . मला फक्त खर काय ते तुला दाखवायचं होत . "
" दाखवलंस ना मग आता जा कि काही हवं आहे माझ्याकडून त्याबदल्यात "
" मला काही नको " तो शांतच होता पण ती शांत व्हायला तयार नव्हती .
" एक मिनिट थांब असे उपकार नको माझ्यावर चल जाऊया " आपण म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन ती जाऊ लागली .
त्याने तिला अडवलं " कशासाठी करते आहे हे "
" मला हवं आहे हे "
" मूर्ख आहेस का ? त्याला दाखवण्यासाठी कशाला हे करायचं ? "
" मग तुला काय हवं आहे फिजिकल व्हायचंय का ? " ती थांबायला तयारच नव्हती .
" उगा काही बडबडू नकोस "
" काय होतंय त्याने तुला हि आनंद मिळेल आणि मला हि , तुम्हाला आमच्यात दुसरं काय हवं असत आमच्या भावना शून्य , फक्त हेच महत्वाचं "
" आणि पुढे काय प्रेग्नंट होणार ? "
" कशाला एक गोळी घेतली कि झालं "
" काय वाटतंय तुला लेमन च्या गोळ्या आहेत का ? "
" तुला काय करायचं आहे काय होईल तो त्रास मला आहे . आताही होतो आहेच नंतरही होईल "
" हे बघ माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला लाईफ पार्टनर म्हणून पाहतो . मला त्या वे नि  तुझ्याकडे पाहायचं आहे . असं क्षण दोन क्षणासाठी physical relation  बनवून तुझ्यापासून दूर नाही जायचं मला .  "
" हे बघ आपल्यात फार age difference आहे "
" मग त्यानी काय होत हि गोष्ट तोट्याची थोडीच आहे . दोघांमध्ये एकजण समजून घेणारा असेल तर काय वाईट आहे का ? "
" हे बघ मला कॉन्सेलर नको आहे लाईफ पार्टनर हवा आहे जो माझ्यासोबत माझ्यासारखं बेधुंद आयुष्य जगू शकेल "
" असं थोडीच आहे कि आपण लाईफ पार्टनरच व्हावं . आपण बोलू तर शकतो . हे बघ मी तुला तेव्हा तस विचारलं होत आणि तुझ्या एका नाहीमुळे मी पूर्ण थांबलो होतो . पण त्यामुळे आपल्यातली फ्रेंडशिपसुद्धा संपली . जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा हे भाऊ म्हणणारे कोणीही मदतीला आले नव्हते . फक्त तूच मदतीला आली होतीस . तू एक ट्रू पर्सन आहेस . म्हणूनच मला तू मैत्रीण म्हणून हवी आहेस . एक तूच अशी आहेस जिच्यावर मी संपूर्ण विश्वास ठेऊ शकतो . आणि तू पण मान्य करशील कि मीही तितकाच ट्रू आहे तुझ्याबाबतीत . सो मित्र म्हणून सोबत राहू शकतो ना आपण . आणि बोलून तर बघ माझ्यासोबत तुझे प्रॉब्लेम सुटतील किंवा तुला हे कळेल कि हा प्रॉब्लेमच नाही . मोकळेपणाने बोल आणि समोर समोर बोलायला ऑड वाटत असेल तर कॉल कर . हे बघ माझ्या मनात काय आहे ते मी तुझ्या समोर ठेवलं आहे , त्यामुळे मी तुला परत अप्रोच करण चुकीचं ठरेल . आता तू ठरवायचं आहे  एकदा बोलून तर बघ किंवा एक कॉल करून तर बघ . मी वाट पाहीन तुझ्या कॉलची . " 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "