मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शृंगार ३

          उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो . मी स्वतःकडे पाहिल , मी पोटात लाथ बसु नये म्हणून माणूस ज्या पोझीशनमधे असतो त्या पोझीशनमधे होतो . ती लाथ मारणार होती , छे उगाचच काहीही . तिने नुसता असा काही अविर्भाव केला कि कृतीची गरजच नाही पडली . आणि मी घाबरलो , छे ती नुसती प्रतीक्षिप्त क्रिया होती . जाऊदे दमते बिचारी काम करून  . आज झोपूदे उद्यापासुन येईल ना ती .           बाहेर पडलो तर रस्त्यावर दोन - तीन कुत्री आणि मीच होतो . जिममधे पोहोचलो तिथ एक कुत्रा

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .

शृंगार १

          उरोज  नितंब  आणि   तसलेच  काही  शब्द  असलेल पुस्तक  होत  ते  .  शेजारी  बसलेला  मुलगा  ते  वाचत बसला  होता  .  छे  नुसत  अस  काही  वाचुनही  लोक एक्साईट  होतात  . नाही  म्हणजे  आपण  एक्साईट व्हायला  हव  कि  नको  .  काही  हरकत  नाही ,  पण  आता आपले  दिवस  कर्तृत्व  दाखवण्याचे  ,  कृती  वाचत बसण्याचे  नाहीत  .  पण  काय  हरकत  आहे  अस  वाचून स्फुरण  चढणार  असेल  तर  .