मुख्य सामग्रीवर वगळा

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . पण त्याची असं एखाद्या सशासारखं गडबडीत गवत खाऊन धूम ठोकणे त्याला पटणार नव्हतं . त्याच काम राजेशाही होत . शिकार करायची तर सिंहासारखी रुबाबात . आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तोही तब्बेतीत . त्याने तिला परत खेळवायला सुरु केलं त्याच्यासमोर ती तडफडत होती . मिलनासाठी व्याकुळ होऊन त्याला वारंवार आर्जव करत होती . पण तो अजूनही त्याच्या सावजाला खेळवतच होता . तिला चेतवतच होता . त्याचा खेळ रंगात आला होता आणि अचानक त्याच्या कानावर ती कोल्हेकुई पडली . कोल्हेकुई कि अजून काही . पण जे काही होत ते फार भेसूर होत . त्यानं पाहिलं तर एव्हाना बाहेर चांगलंच अंधारून आलं होत . आता मात्र त्याचा सगळा मूड गेला . भीतीची शिरशिरी त्याच्या अंगावरून फिरली . त्याने तिला झिडकारलं आणि तो स्वतःच आवरू लागला . त्याला आता शक्य तेव्हढ्या लवकर तिथून निघायचं होत . त्याला असं जाताना पाहुन ती चवताळून उठली .
" काय चाललंय तुझं ? असं कुठवर करणार आहेस ? दरवेळेस मला अधुरी सोडून जातो आहेस . तुला जर काही करायला जमत नसेल तर येतो तरी कशाला . "
रागारागात असं बोलून ती त्याच्या दिशेने येऊ लागली . त्याने तिचं असं रूप पहिल्यांदाच पाहिलं होत . त्यामुळे तो थोडा हडबडला पण ती काय करणार आहे आपल्याला असा विचार करून स्वतःच आवरु लागला . पण तेव्हढ्यात ती त्याच्यापाशी पोहोचली होती आणि तिने त्याला जोराच्या ताकतीने ढकललं . तो बेसावध होता त्यामुळे एकदम धडपडायला झालं त्याला . तो सावरणार इतक्यात तिने त्याच्यावर परत हल्ला केला . त्याला थोडी वर्मी लागलं होत . तो खाली पडला होता आणि ती त्याला ओढत होती . तो तिच्यापेक्षा कितीतरी तगडा होता . तरीही ती असं करत होती . त्याला समजत नव्हतं हिला इतकी ताकत आली कशी . पण तो विचार करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता . कारण त्याला लागलं होत आणि त्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करत होता आणि ती त्याआधीच त्याच्यावर तुटून पडली होती . तिने त्याला ओढतच बेडपाशी आणलं . आणि जोराच्या ताकतीने त्याला जवळपास बेडवर भिरकावलं . तो अविश्वासाने हे सगळं पाहत होता . ती त्याच्यावर स्वार झाली . आणि त्याला वेड्यासारखी कीस करू लागली तिने त्याला स्वतःपाशी ओढून धरलं होत आणि त्या प्रयत्नात तिची नख त्याच्या पाठीत घुसत होती . त्याला तो त्रास जाणवत होता पण तो सहन करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता . ती तिची बोटं त्याच्या छातीवरून फिरवू लागली बोटांसोबत तिची नखही त्याच्या छातीचा वेध घेत होती . त्या होणाऱ्या जखमांपासून तो सावरत होताच तोपर्यंत तिच्या दातांनी त्याच्यावर हल्ला केला ती त्याच्या छातीवर चावे घेत होती . पण कोणत्याही रोमँटिक लव्ह बाईट सारखे नव्हते ते त्यात होती वखवख . तिचे दात त्याच्या छातीत किती घुसत होते त्याला काही मर्यादा राहिली नव्हती . मधेच तिने त्याच्या कानाच्या पाळीचा चावा घेतला . तो इतका जोरात होता कि आपला कान ती तोडतेय काय असं त्याला वाटत होत . त्याला खूप त्रास होत होता . त्याला तिला दूर सारायच होत पण मनात असूनही तो काही करू शकत नव्हता . त्याला समजत नव्हतं आपल्याला असं काय झालं आहे ज्यामुळे मनात असूनही आणि शक्य असूनही आपण प्रतिकार करू शकत नाहीये . तिचा तो थयथयाट तसाच सुरु होता . ती त्याला ओरबाडत चावे घेत रक्तबंबाळ करत होती . आता ती त्याला किस करू लागली आधी हळुवार मग खोल आणखी खोल . त्याच्या जीभेला ती किस करू लागली आणि अचानकच तिने त्याच्या जिभेचा चावा घेतला . त्याला आता हे नको झालं होत . जोराचा आवाज झाला आणि ती धाडदिशी कोसळली . त्या धक्क्याने ती बेडवरुन अर्धी अधिक खाली लटकत होती . पण पूर्णपणे त्याच्यावरून बाजूला झाली नव्हती . त्याने तिला स्वतःहून बाजूला केलं . आणि धडपडत तो उठला स्वतःचे कपडे घेऊन ते न घालता तसेच हातात घेऊन बाहेर पडला . तो विचार करत होता , ' नशीब तो रॉड हाताला लागला आणि तो तिच्या डोक्यात व्यवस्थित मारता आला . नाहीतर आपलं काही खरं न्हवत . ' तो बाहेर आला . बाईकपाशी येऊन त्याला चावीची आठवण आली . त्याने कपड्यात तपासली पण तिथे ती नव्हती . त्याने परत परत पाहिली पण तिथे नव्हती ती . छे बहुदा कपडे तसेच घेऊन येताना पडली असावी . एव्हढ्या मुश्किलीने बाहेर पडलो आणि आता परत आत जायचं . पण पर्याय नव्हता . तो तसाच आत गेला त्याने तिथं चावी शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ . आणि अचानक तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो बाजूला झाला पण त्याचे कपडे तिच्या हातात आले . एव्हढा वेळ त्याने कपडे अंगावर चढवलेच नव्हते ते त्याच्या हातातच होते त्याने ते सोडवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ . मग त्याने ते तसेच तिच्या हातात राहू दिले आणि बाहेर धूम ठोकली . गाडी तशीच सोडून तो रस्त्याने जिवाच्या आकांताने धावू लागला . अंगावर एक कपडा नाही पण त्याला त्याची शुद्ध नव्हती . तो कितीतरी वेळ धावतच होता . किती वेळ धावला काय माहित पण मग थोडा दम लागला म्हणून चालू लागला . असाच चालत होता आणि अचानक मागून काहीतरी डोक्यात .... हळूहळू त्याची शुद्ध हरपत होती आणि तो धाडकन तिथेच कोसळला .....

... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?