मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सावज (भाग ४)

सगळ शांत वातावरणात सुरु होत . सगळे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आणि अचानक सर्वांच्या कानावर ती किंकाळी पडली ......  काऊंटर जवळचा सगळा स्टाफ , आलेले कस्टमर सगळे तिकडे धावले .  अशा वेळी सभ्यता किंवा पाळण्यात अर्थ नव्हता त्यामुळे  मॅनेजरने रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवला . एक क्षण तो उघडला गेला नाही तोपर्यंत कुणाच्याही जीवात जीव नव्हता . काय झालं असेल याची चिंता आणि उत्सुकता दोन्ही होती . दरवाजा उघडला गेला .  " काय झालं सर , मॅडमचा ओरडण्याचा आवाज आला . "मॅनेजरने विचारलं .  " काय तुमचं हॉटेल आहे इतके चार्जेस घेता आणि काय प्रकार आहे इथं ? " तो गुश्यातच बोलला .  मॅनेजरला काय समजत नव्हतं . त्याने परत अदबीनं विचारलं  " सर काय झालं ते तरी सांगा ? " " काय काय इथे पाल पडली तिच्या अंगावर . काय रूम्स आहेत या ? पाली काय झुरळ काय काही पेस्ट कंट्रोल वगैरे काही करता कि नाही ? " तो चांगलाच चिडला होता .  मॅनेजरने जरा आसपास पाहिलं . सोबत स्टाफ आणि दुसरे कस्टमर पण होते त्याने हॉटेल स्टाफ ला खाली काऊंटरपाशी कोणी तिथे जायला सांगितलं . सोबत दुसऱ...

शब्दभ्रमर (भाग ३)

त्याने डोळे उघडले . किती वेळ झोपला होता काय माहित . गाडी कुठेतरी थांबली होती आणि गाडीत तो एकटाच होता . प्रिया कुठं गेली असा विचार करत तो बाहेर आला . गाडी एका तलावाच्या शेजारी उभी होती आणि आसपासचा सगळा परिसर निसर्गरम्य होता . पण आपण नक्की कुठे आहे हे काही त्याला समजत नव्हतं त्याने इकडे तिकडे पाहिलं पण प्रिया काही दिसली नाही . शेवटी तो त्या तलावाकडे गेला. हातपाय धुऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले मग जरा फ्रेश वाटलं . मग तो इकडे तिकडे पाहू लागला . तेव्हा दूरवर घरासारखं काहीतरी दिसलं कुणाची तरी उपस्थिती तिथं जाणवली . म्हणून त्यानं तिकडं जायला सुरुवात केली . अंतर तस फार नव्हत पण रस्ता धड नव्हता किंवा त्याला तो सापडत तरी नव्हता . काटेरी झाड झुडपं होती त्यात अडकून त्याचे कपडे खराब होत होते , फाटत होते . त्याला वाटलं परत जावं . पण तरीही तो पुढे जातच राहिला आणि एकदाचा त्या ठिकाणी तो पोहोचला. जुना बंगला होता तो . फार कुणाचा वावर त्या परिसरात होत असेल असं वाटत नव्हतं . पण तरीही त्याने त्याच्या चारी बाजूनी एकदा फेरफटका मारला पण त्याला कोणीही नाही दिसलं . मग त्याने विचार केला आप...

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार ...

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क ....

सावज (भाग ३)

कितीवेळ तरी लाईट नव्हती केव्हातरी आली ती . मग तिने तिचा फोन चार्ज केला आणि त्याला फोन लावला . " कसा आहेस ? " " मी ठीक आहे . तुला मघाशी फोन केला होता तर तुझा फोन बंद लागला . " " अरे किती वेळ लाईट नव्हती. आता आली . तेव्हा तुला फोन केला . " " हे बघ माझं काम झालं आहे तू ये इकडे  " त्याने एक पत्ता तिला मेसेज केला आणि त्या पत्त्यावर यायला सांगितल . ती वाटच पाहत होती यासाठी . त्यामुळे ती लगेच तयार झाली आणि निघाली . तिची गाडी पुलापाशी आली तर अजूनही पाणी वरून वाहत होत . पण तिला राहवत नव्हत त्यामुळे तिने तशीच गाडी पुढे नेली . ======================================================= काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.     " हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जा...

सावज (भाग २)

तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही  foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला . रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि...

शामली

 प्रेम एक अशी भावना ज्याला रंग रूप वयाच भान नसत . ज्या वयात भातुकली खेळायची त्या वयात त्या दोघांनाही ते जाणवायचं . तो आणि ती दोन टोकाचे तो तो गोरा गोमटा , ती सिम्पल आणि साधी , नाकी डोळी नेटकी पण रंगान जराशी सावळी . अगदी लोभस आणि चुणचुणीत होती ती . कुणालाही आपल्या बोलण्याने आपलंस करणारी . " तुला लागलं ना ." " त्याला काय होतंय तुला नाही ना काही झालं. " " मी ठीक आहे ग . इतकं लागलं तरी तू माझाच विचार करते आहेस. " " मग करणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर . " " इतकं प्रेम करतेस माझ्यावर . " " हो . तुला काही शंका आहे का ? " " अजिबात नाही. तुला एक सांगू . " " काय? " " मी मोठा झालो ना कि तुझ्याबरोबर लग्न करणार. तू करशील ना माझ्याशी लग्न. " " हो करीन ना. " त्या न कळत्या वयात पण दोघांमध्ये इतकं प्रेम इतका स्नेह होता . जवळपास सगळ्यांनीच त्यांना नवरा बायको मानलं होतं. ======================================================== " शामली अग आमच्या रोहितला भारी-भारी स्थळ यायला लागली आहेत. अगद...