मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .
पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या . आता काही दिवसांनी एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करावा लागतो की काय कुणास ठाऊक . हं डबलडेकर लोकल नाही तर हा उपाय होईल . जाऊदे मी पण काय विचार करत बसलो . जो प्रश्न इतक्या वर्षात नाही सुटला तो आता काय सुटणार आहे . पण चांगला विचार आहे एकमेकांच्या उरावर बसून . पण यात वर  बसणा-याची मजा आहे , तेही खाली कोण आहे याच्यावर . बाकी खालच्याच मरणच आहे . आणि हा अनुभव तर रोजचाच आहे , बॉस बसलेलाच असतो रोज उरावर . आता लोकल शिवाय दुसरा इतका फास्ट आणि परवडणारा पर्याय नाही . त्यामुळे ते तर बदलता येणार नाही . दुसर म्हणजे ऑफिस तिथ काही तरी करून वेळ वाचवायला हवा . बाकीच नंतर पाहू पण आधी आठ एक दिवस रजा काढून कुठतरी फिरून येऊ . अगदी बाहेर नाही गेलो तरी घरी तरी राहू सोबत काही वेळ , तेवढाच चेंज . बघू एवढ्यातच थोडातरी फरक पडेल . आता ऑफिसमध्ये जाऊन पहिल हे काम करूया .  लोकल स्टेशनवर पोहोचली सोबत विचारही निर्णयाच्या स्टेशनवर पोहोचले होते . आता आनंदातच आपला मोर्चा ऑफिसकडे वळविला . ऑफिसमध्ये सर्व आलबेल आहे हे पाहून काही वेळाने बॉसच्या केबिनमधे गेलो . आणि बॉससमोर रजेचा विषय काढला . इतका वेळ शांत बसलेला कुत्रा अचानक अंगावर धाऊन आल्यासारख झाल . काही बचाव करता आला नाही  . छे काही कारण पण पुढ ठेवू दिल नाही . ह्या माणसाला काय बोलाव तेच कळत नाही . घरी बायकोशी भांडून येतो कि काय ऑफिसला कुणास ठाऊक . याच्या तर .... चार दोन शिव्या तरळून गेल्या जीभेवरून  . आता पुढे काय ? मोठा प्रश्न आ वासून उभा होता . काहीतरी करून वेळ काढणे गरजेचे होते . काय कराव आता ? पण मला प्रश्न पडतोय काय प्रॉब्लेम असेल बॉसचा ? काय असणार स्वतःच वैवाहिक जीवन सुखी नसेल म्हणून बघवत नसेल दुसऱ्याच . घरी कर्तबगारी दाखवण्यात कमी पडत असेल म्हणून इथे कर्तबगारी दाखवत असेल . घरी कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल आणि त्याच फ्रस्ट्रेशन हा इथ काढत असेल . कमी पडतोय म्हणून बायको ओरडत असेल ; बाकी जास्त पडत असेल तरी बायको ओरडणारच . एकूण काय तर कमी किंवा जास्त पडो बायको ओरडणारच . बाकी पुरूष म्हणून उभ राहण हीच  कोणत्याही पुरुषाची सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट . पण नुसत उभ राहूनही फायदा नाही , काम आणि रिझल्ट महत्त्वाचे . जाऊदे आपल काय चालल होत आणि हे काय . मग काय करु सरळ राजीनामा देऊन दुसरी नोकरी पहावी का ? छे हे फारच होईल .पण आयुष्य अस वाया घालवण्यात काय अर्थ आहे ? हो कितीही अघोरी वाटला तरी या शिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याकडे . ठिक आहे हेच करू पण आधी कुणालातरी सांगून बघू . सावंत काकांकडे हा विषय काढला .
          " अरे वेडा झाला आहेस का तू ? अरे अशी कशी तडकाफडकी नोकरी सोडण्याचा विचार केलास ? हे बघ एक तर आपण काय IT वाले नाही कि कधीही आणि कितीही वेळा नोकरी सोडायला . तेही फार विचार करुनच करतात अस . आणि बघ तुला या वयात जो पगार मिळतो तो बराच जास्त आहे . इथून सोडून दुसरीकडे कुठ गेलास तर तुला इतका पगार मिळेल याची शाश्वती नाही आणि एक्सपिरियंस असला तरी तिथे तू नवखाच ना ? म्हणजे काम नक्कीच जास्त . अरे म्हणजे पगार कमी आणि काम जास्त . मुर्खपणाच नव्हे का हा ."
          अरेच्या ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली  नाही कि काम वाढुही शकत आणि त्यामुळे वेळही . छे यात काहीच शाश्वती नाही वेळ वाचण्याची , उलट वेळ जास्त जाण्याची शक्यताच जास्त  .आणि नविन जागी तर मग फारस काही करताही येणार नाही . छे हे म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारख होईल . बर झाल आपण आधी विचारल सावंत काकांना . काकांचे आभार मानले . मग कामाला लागलो . म्हणजे झाल आता नोकरी बदलणे हाही पर्याय गेला . फिरून परत पहिल्याच ठिकाणी पोहोचलो होतो . आता काय ? ठिक आहे मग आहे तो वेळ चांगल्या पद्धतीने वापरूया . थोडी फिटनेस वाढवूया , थोडा इंटरेस्ट वाढवूया , स्वतःचा आणि बायकोचाही . जिम जॉइन करूया . पण जिमसाठी वेळ कुठे आहे ? जाऊदे नाहीतरी आपण घरी जाऊन काय उपटतो ? उपटणे , कापणे का क्रीम काय कराव ? हे या क्षेत्रातले दिग्गज कसे अगदी क्लीन क्लीयर असतात तस कराव काहीतरी . पण काय करत असतील ?  उपटणे छे आतंकी पर्याय . कापणे ठिक आहे पण भलतच कापल तर अवघड व्हायच , आहे तेही हातच जायच . क्रीम कुणाला माहीत याच्यासाठी वेगळ असत का ते बायका हाता पायावरच्या केसांसाठी वापरतात तेच असत , कुणाला माहीत ? एकदा चौकशी करायला हवी . कुणाकड करावी चौकशी ? जाऊदे उगाच ओळखी पाळखीच्यात नको . मेडिकलमधे करुया चौकशी  , तेही जरा लांबच्या , उगाचच आपल अज्ञान नको जगापुढे . आपण इतक्या दिवसात अस काही वेगळ करण्याचा प्रयत्न केला नाही . नेहमी आपली तीच घिसीपिटी टेक्निक . घिसी आणि पिटी या पेक्षा  वेगळ काय करणार ? तेच ते पण जरा नये अंदाज मे .......



                                                                                                                                           ..... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?