मुख्य सामग्रीवर वगळा

पूर्वा ( भाग १ )

     ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं  माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .



    " ए सरे, अग कुठं चालली आहेस ? अग थांब . " पूर्वाने त्या गाडीवर जाणाऱ्या दोघांना पाहून आवाज दिला .
    " ए अग ती त्याच्याबरोबर चाललीय, बाॅयफ्रेंड असेल तिचा, गाडीवर आहे, सगळ्यांपासून लपून फिरायला आले असतिल. अन तुमि तिला हाक काय मारताय ? "  रेखा घाबरूनच म्हणाली .
    " कोण ? " - पूर्वाने न कळल्यासारखं विचारलं .
    " ती "  रेखा तिच्याकडे बोट दाखवून म्हणाली .
    " ती कोण ? " - पूर्वाला आता चेव आला होता .
    " अग ती सरी  " - रेखा
    " अग कोण सरी " - पूर्वा
    " ती गेली ती "  - रेखा
    " ती सरी आहे " - पूर्वा
    " अग तूच तर म्हणालीस कि " -  रेखा
    " मी ओळखत नाही तिला " - पूर्वा
    " अग मग हाक कशी मारली ? " रेखा
    " हाक मारायला काय ओळख लागते काय ? " - पूर्वा
    " ओळख ना पाळख तू अशीच बोलत होतीस तिला "रेखा
    " अग ती त्याच्यासोबत होती, मग ओळखीची असती तरी नसत बघितलं तिनं वळून ." - पूर्वा
    " काय बाई तू पण " रेखा
    " मग अग नुसती मजा करायची गं " - पूर्वा  " हि बघ अजून एक येतेय चल मार हाक "
    " ए नाय " -  रेखा
    " नाय काय नाय, मार म्हणतेय ना " -  पूर्वा
    " अग नाव नाही माहित " -  रेखा
    " अग बोल कायपण " - पूर्वा " पूजे म्हण "
    " अग म्हण लवकर "
    " ए पूजे, ए पूजे आग थांब तर "
    " अरे कोणीतरी ओळखीचं आहे , चल लवकर "  ती बावरून त्यांच्याकडे पाहून आणि पटकन तोंड फिरवून घाबरलेल्या स्वरात म्हणाली .
    " अग खरंच पूजा निगाली कि ती " - पूर्वा  " आपण सही नाव शोधलं ना "
    " अग नाय पूजाच होती ती , आमच्या आत्याच्या हिकडं राहती , सुरुवातीला नाही ओळखलं पण नंतर बरोबर कळली . पण हि इथं इतक्या लांब कशी ? " रेखा
    " बघा पोरींनो घ्या आदर्श , पोरी दुसऱ्या गावातून इकडं फिरायला येतायत आणि तुमि राहा अश्याच "  नंदा सांगत होती . तिला वाटायचं कि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत .
    " ए कायपण सांगते का तिला . कशाला पाहिजे ती नसती कटकट . आपण आहे तशा बऱ्या आहोत . " - पूर्वा
    " अग हो अशीच राहणारे का आयुष्यभर , तुला नको का कोणी हिरो ? " नंदा तिला आव्हान दिल्यासारखी म्हणाली .
    " ए ते तेव्हाच तेव्हा बघू आता आपला एन्जॉयमेंट हाच , ए ती बघ ती बघ .... " - पूर्वा

          किती हसायचे मी तेव्हा, अगदी डोळ्यात पाणी यायचं . आताही आहेच डोळ्यात पाणी पण सोबत हसू नाही .

    " ए काय ग काय म्हणत होतीस आता काय नको , आणि त्या राहुल्याबरोबर काय चाललय ग "
    " अग फ्रेंड आहे तो आपला त्याच तस काय नाय  . "  - पूर्वा
    " हं म्हणे फ्रेंड बगु कि "
    " हो बघ बघ, कुठे बघते पंचांगात ? "
    " पंचांगात कशाला इथंच कळलं कि काय आहे आणि काय नाही ते . "
    " कळेल ना मग कळल्यावर बघू . "

    " ए राहुल्या काय करतोय "  - पूर्वाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि विचारलं 
    " काय नाही ग ते फीच थोडं टेन्शन होत " - राहुल
    " ए रडक्या, सारखा काय रडत असतो रे ? याच टेन्शन त्याच टेन्शन होईल रे काहीतरी तू टेन्शन नको घेऊ . "
    " टेन्शन कस नको घेऊ ते तर घ्यायलाच हवं कि . "
        तिनं त्याच्याकडं एकदा पाहिलं आणि म्हणाली, " बर चल फुगडी घालायला . "
    " अगं मी काय मुलगी आहे का  ? "
    " नाहीस का ? मला वाटलं मुलगीच आहेस . रडूबाई ... "
    "  ए पूर्वा थांब तुला आता मी " असं म्हणत तो तिच्यामागे धावला . तिही पुढे धावली . हे नेहमीचच होत दोघांनाही एकमेकांच्या खोड्या काढल्याशिवाय राहावायचं नाही . इतर कुणी मैत्रिणींपेक्षा त्याच्याबरोबरच तिचा वेळ छान जायचा . दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडायची पण आतातर दोघांना दुसरं काही सुचतच न्हवत .



    " ए येडू काय झालं पुन्हा का बसलाय चेहरा पाडून . तुला असं रडल्या शिवाय, तोंड पाडून बसल्याशिवाय जेवण पचत नाही का ? " याच्यावर नेहमीसारखं न चिडता तो तसाच बसून होता आणि तसाच विचारात होता . तिला काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं .
    " काय झालं असं का बसला आहेस ? " तो काहीच बोलला नाही . ती त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली, " मला सांगणार नाहीस का ? " त्याने तिच्याकडे वळून पाहिलं
    " अग आज लास्ट डेट आहे गं फी भरायची आणि माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत "
    " असं आहे का म्हणून तू इतका टेन्शन मध्ये आहेस तर . "
    " अगं पैसे नाही भरले तर वर्ष वाया तर जाणार नाही ना . " त्याच्या डोळ्यात पाणी होत . त्याने तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि तो रडू लागला . तिला फार विचित्र वाटत होत . काहीतरी करायला हवं . पण ती काय करू शकणार होती . एकाएकी तिला काहीतरी सुचलं आणि ती त्याला म्हणाली " ए रडूबाई रडायचं बंद कर आधी . आणि चल माझ्याबरोबर . "
    " अगं कुठं ? "
    " तू चल आधी " असं म्हणत तिने त्याच्या हाताला पकडून जवळपास ओढतच त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेली . " तू बस इथेच मी आलेच . " थोड्याच वेळात ती आली . " हे घे " असं म्हणत तिने हात पुढे केला त्यात पैसे होते " अगं तुझ्याकडे कुठून आले पैसे  ? "
    " होते रे तू घे जा भर तुझी फी . होईल ना याच्यात "
    " होईल म्हणजे थोडे जास्तच आहेत "
    " असू दे तुला लागतील ठेव सगळे "
   त्याने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला " तुझे आभार कसे मानू हे कळत नाही "
मित्र म्हणून दंगा मस्ती करताना एकमेकांना स्पर्श व्हायचा पण असं कधी वाटायचं नाही पण आता असं का वाटतयं , मघाशी त्याने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं तेव्हा आणि आता त्याने माझा हात हातात घेतला तेव्हा . काही वेगळच वाटतंय . तोच तो . आणि तोच स्पर्श आज फारच वेगळा वाटतोय . असं का होतंय मला . ती तिच्या विचारताच होती आणि तो बोलतच होता . थोड्यावेळाने ती भानावर आली तिचे हात अजूनही त्याच्या हातातच होते . तिने ते सोडवून घेतले आणि म्हणाली
" आभार प्रदर्शन झालं असल्यास या आपण . शेवटचा दिवस आहे जा फी भर . " तिनं ऑर्डर करून त्याला जवळपास ढकलुनच बाहेर पाठवलं . तो गेल्यावर तिला परत परत तेच आठवत होत आणि ते आठवून तिच्या ओठावर एक हलकिशी स्माईल आली  . तेव्हढ्यात रेखा आली . " अगं काय एकटीच काय हसतेय वेड्यासारखी . बरी आहेस ना . काही तापबिप नाही ना चढला डोक्यात . " असं म्हणत तीन तिच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं . पुर्वाने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला सोबत घेऊन एक गिरकी घेतली " अगं काय चाललय काय ? "



         त्यानंतर एकदा रेखा तिच्याकडे आली होती .
    " अगं पुस्तक का घेतली नाहीस "
    " अगं घेईन गं . "
    " तू इतका वेळ थांबत नाहीस कधी आणि स्कॉलरशिपचे पैसे मिळाले ना . "
    " ए बाई हळू ? "
    " का गं ? "
    " आई ऐकेल ? "
    " का तू सांगितलं नाहीस . "
    " नाही सांगितलं . "
    " आणि काय केलंस पैशाचं ? "
    " काही नाही . "
    "आता सांगते का तुझ्या आईला सांगू ? "
    " ए थांब थांब . सांगते . "
    " हा सांग . "
    " राहुल आहे त्याला फी ला पैसे न्हवते . मगं मी दिले . "
    " स्कॉलरशीपचे ? "
    " हो . "
    " तुझ्याकडं काय झाड लागलाय का पैशाच ? आणि पुस्तक कशी घेणार आहेस . "
    " घेईन नंतर "
    " अगं मला तरी सांगितलं असत तर माझ्या सोबत केला असतास कि अभ्यास "
    " बघ तू आहेस मग मला कशाची फिकीर ? "
    " हं आता पुरे आणि आता असं करू नको परत "
        तिनं तिच्या स्माईलमध्ये पुढचे सगळे प्रश्न विरघळून टाकले .

         तीच स्माईल आजही बरेच प्रश्न आणि खूप सारे अश्रू विरघळवत आहे .



     क्या यही प्यार है ? हाँ यही प्यार है , हो दिल तेरे बिन कही लगता नही, वक्त गुजरता नही . क्या यही प्यार है रेडीओवर ते गाणं सुरु होत आणि तिच्या मनात येत होत खरंच क्या यही प्यार है

     तो आज खूप अडखळत बोलत होता . काहीतरी होत त्याच्या मनात , ते त्याला सांगायचं होत पण त्याला सांगता येत नव्हतं .
    " पुर्वा, एक विचारू ? "- राहुल
    " हो विचार ना "
    " विचारायचं म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं होत "
    " नक्की काय ? विचारायचं कि  सांगायचं होत . "
    " म्हणजे मला तुला ... "
    " ऐकतेय मी बोल तू "
    " माझं... माझं प्रेम आहे तुझ्यावर . काय तू हि...  ? " एका दमात त्याने त्याला शक्य होत ते सगळं सांगितलं .
    " काय म्हणालास ? " पूर्वा थोडीशी रागातच म्हणाली .
    " काही नाही म्हणजे ते ... " तो अचानक बावरला . त्याला तस पाहून तिच्या ओठावर हलकीशी स्माईल आली आणि ती म्हणाली ,        
    " घाबरलास काय ? अरे माझही प्रेम आहे तुझ्यावर . कधी तुझ्या प्रेमात पडले कळलंच नाही रे "
    " तू मला होकार दिलास म्हणून मला किती सुटल्यासारखं वाटतंय काय सांगू पण कस होईल माझी परिस्थिती हि अशी . "
    " अरे होईल रे . आता आपण आहोत सोबत . "
    " पण एक सांग आजकाल तू इतकी शुद्ध कशी बोलू लागली आहेस ?"
    " कॉलेजसाठी गावातून बाहेर पडले , दुसऱ्याचं बोलणं आणि बरचस वाचन यांनी झाला असेल कदाचित हा बदल .
    " वा मस्त आहे "

....क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?