मुख्य सामग्रीवर वगळा

बाबा नव्हताच तिथे

          स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला ....  कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .

          बाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर  व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छपत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच खुर्ची पण...  पण बाबा नव्हताच तिथे ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .