मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार ५

       एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .


     या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न . तरीही काही ठिकाणी हे थोडे कमी-जास्त होते आहे . इतक variation  वाचक सांभाळू शकतील .

       माझ्यासाठी लेखकाने गोष्ट लिहिली कि ती तिथेच संपत नाही किंवा पूर्ण होत नाही . वाचक ती वाचतात आणि त्याचा अर्थ लावतात तिथे ती पूर्ण होते . काही ठिकाणी जिथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास वाचकांनी स्वतःच्या सोईचा अर्थ घेतल्यास हि गोष्ट तुम्हाला जास्त जवळची वाटेल व तुम्हाला जास्त  आनंद होईल .

      तुम्ही कथा वाचता आहात आपले अभिप्राय देत आहात हे पाहून आनंद झाला . तुम्हाला असाच आनंद पुढेही देण्याचा प्रयत्न राहिल .
...........................................................................................................................................

          मेणाहून कोमल आणि वज्राहून कठोर अशा प्रकारचे वर्णन एकाच गोष्टीचे असेल तर ती गोष्ट कोणती ? असो ज्याचा त्याचा वेगळा विचार असू शकतो . पण हि फक्त उपमा  असू शकते  . ख-या जगात बराच फरक पडू शकतो . महाभारतात दुर्योधनाचा काही  भाग कमजोर राहिला आणि तेथेच सातत्याने मार लागून तो गेला . बाकी धर्म अधर्म जरी बाजूला ठेवला तरी झाल ते बरच झाल . त्याने कंबरेला काही गुंडाळलच नसत तर त्याच सगळ शरीर वज्राच झाल असत . मग त्याची बायको काही वाचली नसती . थेट  वज्रच घ्यायच म्हणजे काय ?

          असो बाकी मंजूला वज्राघात तर नाही ना सहन करावा लागत . असा विचार करण्यामागे कारणही तसच होत तिचा चेहरा फार त्रासिक व्हायचा . आणि अशा अनुभवात चेहरा त्रासिक होणे चांगल नाही . म्हणजे अस व्हायलाच नको . आणि तिला याबद्दल विचारण्याच धाडसही नाही होत . कारण  तिला अस काही विचारल तर ती विचारल आहे त्याच उत्तर तर देत नाही उलट दुसऱ्याच विषयावर वाद घालत बसते . त्यामुळे सर्व मुडची वाट लागते . पण एकदा इतर वेळी तिला हे विचारायलाच हव . असाच रेटण्याचा विषय नव्हे हा . ती काही दिवस जिमला आली असती तरी बर झाल असत . पण ती यायलाच तयार नव्हती .

          या विषयावर बोलायचच अस ठरवून रात्री तिच्याकडे विषय काढला . परत तेच तिने दुसऱ्याच विषयावर वाद घालायला सुरूवात केली . पण  मी ठरवल होत आज या विषयावर बोलायचच . मग आधी तिला बोलू दिल . तिच बोलून झाल्यावर परत तिला याबद्दल विचारल तरीही तिने बरेच आढेवेढे घेतले . पण शेवटी बोलली ती . बरच बोलली , पण त्याचा गोषवारा एवढाच होता कि तिला आता यात interest वाटत नाही . आयुष्यात याबद्दल interest न वाटण्याची वेळ येऊ शकते . पण या वयात अस होण नैसर्गिक नक्कीच नाही . नक्कीच तिला दुसरा काही मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल ज्यामुळे अस होऊ शकत पण यावर उपाय किंवा more specifically  उपचार केले तर ती नक्कीच परत पहिल्यासारखी होईल . पण या उपचारांसाठी ती तयार होईल का हि शंकाच आहे . पण हे करायला तर हवेच ना . आधी आपणच भेटू डॉक्टरला मग बघू काय होत ते . आधी शारीरिक समस्या आहे का ते पाहू  मग गरज पडली तर मानसिक समस्येचा विचार करु . ठिक आहे आधी जाऊ Gynaecologist कडे . पण स्त्रीरोग तज्ञाकडे कस जायच आणि तेही सोबत स्त्री नसताना . तिथ आत तरी सोडतील का ? त्याला काय सोडतील कि . पण जी गोष्ट आपल्यालाच awkward वाटते ती दुसऱ्याला कशी सांगावी हा प्रश्नच आहे ना . जाऊदे पाहू तेव्हाच तेव्हा .

          दुसऱ्या दिवशी मी आजारी आहे अस फोन करून सांगितल आणि स्त्रीरोग तज्ञाकडे गेलो . सर्वात आधी पोहोचून तिथ नंबर लावला . लोकांच्या appointments होत्या तरीही सुरूवातीला पोहोचून जास्त वेळ नाही घेणार  अशा सबबीवर सर्वांच्या आधी जाण्याची परवानगी मिळवली .

   " ठिक आहे पेशंटच नाव  "

   बायकोच नाव सांगितल.

   " कुठ आहेत त्या बोलवा त्यांना पटकन परत अपॉइंटमेंटवाले पेशंट कुरकुर करतात . "

   " ती नाही आली मलाच बोलायच आहे डॉक्टरांशी . "

   " अहो स्त्रीरोग तज्ञ आहेत मॅडम तुम्हाला कस तपासणार ? "

   " अहो मी नाही माझी बायको आहे पेशंट . "

   " अहो मग बोलवाना त्यांना . "

   " म्हणजे पेशंट तिच आहे पण आता आली नाही ती . "

   " अहो अस न तपासता गोळ्या नाही देत मॅडम . "

   " मी बोलतो त्यांच्याशी . "

   " तुम्हाला अस नाही सोडता येणार आत . "

   " मी बोलतो तुम्ही इंटरकॉमवर फोन तरी लावा . "

   फोन लावल्यावर विषयाची थोडी कल्पना दिली आणि मला आत बोलावल . हे receptionist लोक विनाकारण बडबड करत बसतात अगदी स्वतः डॉक्टर असल्याच्या थाटात .

   डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली त्यावर त्यांच मत अस झाल कि एवढ्यातच अस घडन अवघड आहे .  routine check up आणि काही test केल्या नंतर निदान होईल . पण फार काही serious वाटत नाही . आता यासाठी मंजूला घेऊन येण गरजेच होत . अवघड आहे पण फार जरुरी आहे .

          घरी गेल्यानंतर मंजूसोबत याबद्दल बोललो . पण ती काही तयार झाली नाही . तिला एकदा विषय सांगून झाला होता आता तिला यावर विचार करायला वेळ द्यायला हवा होता .

          आता काही दिवस प्रेम व्यक्त करत होतो पण तात्पुरत का होईना ब्रम्हचर्य पाळून . तिला वेळ देण गरजेच होत . पण या वेळामधे काही गोष्टी थांबल्यातरी काही गोष्टी नाही थांबवता येत . आपले विचार , आपल्या भावना या व्यतिरिक्त इतर शारीरिक घडामोडीही होत राहतात . दिवस उगवतानाच उभे राहणारे प्रश्न आणि बरच काही . अहोरात्र शारीरिक घडामोडी घडत असतात . एखाद्याला इच्छा होत नसल्यास दुसऱ्याला जास्त प्रमाणात इच्छा का होऊ लागते ? हाताला/हातांना श्रम द्यावे का ? नेहमी खळाळत वाहणाऱ्या प्रवाहाला किती दिवस बांध घालणार ? त्यातच आठवण झाली बांधांना कुठेतरी सांडवा असतो ज्याचा मुळात उद्देशच हा असतो की एका विशिष्ट मर्यादेच्या वर पातळी गेली की पाण्याचा आपोआप विसर्ग सुरू होतो . अस काही शारीरिक बाबतीतही असेलच . तोपर्यत थांबायच का ? कोणी किती वेळ उभ राहू शकत ? असे वेगवेगळ्या विषयावरचे एक ना अनेक  प्रश्न पडत होते , आपल उभे राहत होते .
 
                                                                                                                                       .... क्रमशः


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

सावज (भाग ६ )

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते .  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ किती मादक रूप होत तिचं जे त्याला तिच्याकडे खेचत होत . तो उतावीळ झाला होता . प...

शब्दभ्रमर (भाग २)

आता आताचीच तर गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा या वाटेला गेलो होतो . तिला मानवायला आणि हवं ते मिळवायला ३ आठवडे लागले होते . म्हणजे तितके नसते लागले पण आपल्यालाच अनुभव नव्हता ना त्यामुळे सावधपणा बाळगला होता . आणि तिथून पुढे मग २ ३ ४ ... पुढे तर मोजायचच सोडून दिल . गाडी एकदम फुल स्पीड मध्ये होती . आतातर कित्तेक जणींची नावही आठवत नाहीत , ना चेहरे आठवत आहेत . त्यांना मात्र आपलं नावही चांगलं आठवत , चेहराही आणि सोबत घालवलेले क्षणही . खरच मुली मूर्ख असतात . पण असं डायरेक्ट नाही म्हणायच , त्या इमोशनल असतात . या वाक्याने त्याच्या ओठावर एक हसू आलं. परवा पाहिलेली एक पोस्ट त्याला आठवली ' प्रेमात त्रास कुणाला होतो मुलांना/मुलींना ' काय मूर्ख असतात लोक अनुभव काही नसतो आणि फुकटची पोस्ट करत राहतात . तस बघायला गेलं तर याच उत्तर आहे ' जो गुंततो त्याला त्रास होतो आणि जो गुंतत नाही त्याला कसलाच त्रास होत नाही . आणि बऱ्याच जणांना गुंतायचं नाही म्हटलं तरी ते नकळत कधी गुंततात ते नाही कळत . पण जर मनापासून प्रेम करून त्यात यश नाही मिळालं तर मात्र तो किंवा ती शक्यतो नाही गुंतत कशातच प्रॅक्टिकल विचार ...