मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय आणि नग्नता

        आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच  जन्माला येताना बिना  कपड्यांचाच  जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही .



        बाकी या बाबतीत कपडे नक्की  का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो अगदी लज्जा रक्षण , injury  पासून बचाव , ऊन  थंडी यापासून बचाव आणि अशी अनेक कारणे दिली जाऊ शकतात . हि कारणे  मान्य पण खरच अस आहे का कि आपण शरीर रक्षणासाठी कपडे घालतो असे तर वाटत नाही . आपण भारतीय उपमहाद्विपीय प्रदेशातील वातावरण आणि इथला पोशाख पहिला तर अस नक्कीच नाही वाटत कि हे शरीरसाठी केल जातंय पूर्वीचे पोशाख म्हणजे धोतर किंवा स्रीयांमध्ये साडी हे पोशाख असे होते अस एकवेळ आपण म्हणू शकतो पण टाईट जीन्स आणि तसाच टाईट  शर्ट  हे कसे शरीर रक्षण करणार आहेत ? त्या टाईट  जीन्समुळेतर genitals ला कोणत्याही प्रकारे हवा पोहोचत नाही . या उलट धोतर किंवा साडी यामधून काही प्रमाणात का होईना वायुविजन नक्की होत . बाकी genitals च तापमान इतर शरीरापेक्षा काहीस जास्त असत आणि त्यांचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते . याच कारणासाठी पुरुषांचे वृषण शरीरापासून काही अंतरावर असतात . काही  जीन्स ज्या टाईट फिट किंवा टच स्कीन असतात त्यात वृषणचकाय पण पेनिससाठीही पुरेशी जागा असते किंवा नाही हे सांगणे अवघड आहे . बाकी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी कोणत्याही वयात सार्वजनिक ठिकाणीही ज्याचे कधीही  erection झाले नाही असा पुरुष सापडणे अवघड आहे . आता ज्या जीन्समध्ये normal penis लाही जागा नसते तिथे अशा position मध्ये या महत्वाच्या भागाची काय हालत होत असेल हे सांगायलाच नको . या प्रायवेट पार्टसला इतक तुच्छ का लेखल जात हे खरच न कळणार आहे . हे भागच स्त्री पुरुषांना त्यांच्या उमेदीच्या काळात सर्वोच्च सुख आणि आयुष्यभर आणखी एक महत्वाचे काम करतात . ते किती महत्वाचे आहे हे ज्यांना कधी लघवी अडली गेली आहे व ती होत नाही तेंव्हा कळते . कोणी म्हणेल याचा संबंध आतील भागाशी आणि या पार्टस आधी असलेल्या पार्टसशी संबंधित आहे पण त्या पार्टसमध्ये  काही बिघाड नसताना हे काम हा भाग इमाने-इतबारे करत असतो . आणि इथली infections तर काय त्रास देतात ते सांगायलाही नको पण असे असूनही या भागाची काहीही काळजी घेतली जात नाही . अजिबात जागा नसलेल्या कोंदट ठिकाणी एव्हढ्या जास्त तापमानात हे private part  शिजून निघत असतात पण आपल्याला आपल्या स्टाईलच पडलेलं  असत . या उलट धोतर साडी हे तस  पाहायला गेले तर खालून उघडेच असतात आपल सेमी-नग्नतेशी नात सांगत आपल्या शरीराची मदतच करत असतात . आता कोणी म्हणेल कि कोर्पोरेट ऑफिसमध्ये धोतर घालून जावे काय ? आणि आपण गेलो तरी त्याला परवानगी मिळेल का ? यावर उपाय आपल्यालाच शोधायला हवा . अगदी साडीही परिधान करताना पोट आणि पाठ काही प्रमाणात उघडे राहतात आणि हेच काम करतात .

         काही हॉलीवूड अभिनेत्री बेअर चेस्ट  सीन करतात त्या उलट भारतीय अभिनेत्री कधी असे सीन करताना दिसत नाही (काही अपवाद वगळता ) . याला काय कारण असावे ? काही अभिनेत्री या डाएट आणि झिरो फिगरच्या अशा मागे लागतात कि त्यांच्या ब्रेस्टची पुरेशी वाढही  होत नाही ( काही सन्माननीय अपवाद वगळून ) . मग ब्रेस्टला  बाहेरून सपोर्ट वापरले जातात जेणेकरून ते योग्य प्रमाणात दिसावेत . आता बेअर सीनमध्ये या गोष्टीतर वापरता येणार नाहीत त्यामुळे सत्य समोर येऊ शकते . इथे कुणी असे सीन द्यावे अशी अपेक्षा नाही पण या कारणासाठी त्यांना हे करायला लागू नये असे वाटते . बाकी सस्तन प्राण्यांमध्ये स्री बाळाला स्तनपान करवते आणि पुरुषाला असे काही काम नसले तरीही त्याचे चेस्ट सपाट पोट आणि बरगड्याचा भाग या पेक्षा बरेच डेवलप  असतात याला काही कारण नक्कीच असेल ना  . कारण शरीर संबंधामध्ये जर स्रीचे स्तन आणि पुरुषाची काही प्रमाणात का असेन आपण मेद असलेली छाती कुशनसारखे काम करते . जर ते नसते तर एकमेकांच्या वजनाने आणि आवेगाच्या आलिंगनाने गुदमरण्याची स्थिती होऊ शकते .

        इकडे सनी लिओनि आणि तत्सम नट्या  आपले सुडौल शरीर दाखवत असतात . इथे म्हणण्याचा उद्देश हा नाही कि कोणी शरीर प्रदर्शन करावे किंवा कोणी ते करू नये . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते त्यानेच ठरवावे . त्याचा तो हक्क आहे . बाकी याचा कोणावर काही आणि कसा परिणाम होईल याबाबत असे आहे कि बरेचसे किशोरवयीन याच मार्गाने आपले कुतूहल याच मार्गे शमवत आहेत . हा मार्ग चूक किंवा बरोबर हे ठरवण्याआधी याला दुसरा काही पर्याय आहे का हेही सुचवावे . अनेक ठिकाणी लैंगिक शिक्षणाला सरळ सरळ विरोध केला जातो आणि मग अशा मार्गे हे लोक आपल्याला आवश्यक माहिती मिळवतात . असे किती लोक आहेत जे समुपदेशनाच्या  मार्गाने जाऊ शकतात .

        बाकी अंघोळ करताना सगळे कपडे काढून ( दुर्दैवाने अनेकांना हे सुख मिळत नाही . बर्याच लोकांना एकतर उघड्यावरच अंघोळ करावी लागते किंवा इतकी चांगली सोय नसते कि सर्व कपडे काढावे , त्यांना अंतर्वस्त्रांसोबत अंघोळ करावी लागते आणि जमेल तसे private पार्टस clean करावे लागतात ) जेव्हा आपण नैसर्गिक अवस्थेत असतो तेंव्हा वाटणारी मोकळीक , relax वाटणे याला काय कारण असू शकते ? एका अभिनेत्रीने मला घरात नैसर्गिक अवस्थेत राहायला आवडते असे म्हटले होते . अगदी हे जाहीर करावेच असे नाही पण किमान काही प्रमाणात तसे राहून आनंद मिळवणे चांगलेच . तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ? हा असाच आनंद इतरही बाबतीत नग्नता ( मोकळीक ) ठेवली तर नक्की मिळेल . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर