मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .
   " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "
   " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "
   " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "
   " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "
   " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "
   तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .
   वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरल होत . ती अधिकच सुंदर दिसु लागली होती . ओढून तिला जवळ घेतल . तिच्या मानेवर हळूवारपणे ओठ टेकवले . हळूहळू ओठ तिच्या मानेची चुंबन घेत तिच्या कानांपर्यंत पोहोचले . तिच्या कानाची पाळी दातांमधे पकडून एक हळूवार बाईट .....टिंग टाँग..... परत ओठ तिच्या मानेवरुन फिरत होते ....टिंग टाँग.... ती थोडी दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली ,
  " अहो बाहेर कुणीतरी आल आहे वाटत बेल वाजते आहे . दार उघडा ना . "
" जाऊदे कुणी नाही . थोडा वेळ वाजवेल आणि जाईल असल तरी ."
अस म्हणत मी आणि माझे ओठ आपल्या कामात परत गर्क होण्याचा प्रयत्न करु लागलो .  परत परत बेल वाजत होती . डोक्यात जात होती पण तरीही मी माझ कॉन्संट्रेशन ढळू न देण्याचा प्रयत्न करत होतो . पण बेल काय थांबायच नाव घेत नव्हती . शेवटी वैतागून मंजू दूर झाली आणि म्हणाली
   " अहो एकदा पाहून तरी या कोण आहे . म्हणजे एकदा जाईल तरी . "
   शेवटी मी जाऊन वैतागाने दार उघडले . बाहेर साक्षात वैताग अगदी तशाच वैतागलेल्या चेहऱ्याने उभा होता , सेक्रेटरी .
   " अहो किती वेळा बेल वाजवायची ? "
   "काय झाल ? "
सोबत दोन - तीन मेंबर होते . काहीतरी सिरीयस असाव अस वाटल .
   " अहो काही तक्रारी होत्या लोकांच्या त्यामुळे आज सगळे मेंबर्स एकत्रच आलो होतो . "
   " आमच्याबद्दल तक्रार ? "
   " अहो तुमच्या एकट्याबद्दलच अस नाही ब-याच जणांबद्दल होत्या तक्रारी एक एक मिटवत तुमच्याकडे आलो . "
   मनात विचार चालला होता काय तक्रार असेल आणि हे आले तेव्हा यांना काही आवाज तर ऐकू आला नाही ना ? का जाता-जाता आवाज आला म्हणून तर नाही ना आले हे ?
   माझा विचार चालला होता तेवढयात
   " अहो तुमच्या कुंड्यामधे जे पाणी टाकता त्याचे सगळे ओघळ येत आहेत भिंतीवर आणि तुम्ही फ्रंटला आहे त्यामुळे ते चांगल दिसत नाही आणि खाली कोणी असल कि त्याच्या अंगावर पडू शकत चिखलाच पाणी . "
   म्हणजे यांचा हा सगळा आटापिटा यासाठी चालला होता . यांना आमच ओघळणार सांडणार पाणी अडवायच होत . एव्हढ कुणाच्या अंगावर सांडल होत काय माहीत ?
   " अहो एवढ्यासाठी सर्वांनी यायची काही गरज नव्हती , जाता येता जरी सांगितल असत तरी मी ठेवल्या असत्या कुंड्या काढून . "
   " अहो तेव्हढच नाही तेवढा रंग ही घ्या ना मारुन थोडा ते ओघळ तसे चांगले दिसत नाहीत . "
   मी या लोकांना लवकर कटवाव म्हणून त्यांच ऐकत होतो तर हि संधी साधून ते काहीही म्हणन रेटू पाहत होते .
   तेव्हढ्यात मंजू आली आणि त्यांना विचारु लागली
   " पण आमच्या एकट्याच्याच कुंड्या आहेत का ? बाकीच्यांच्यापण आहेत ना . आणि असे ओघळ तर त्यांच्या इथही आहेतच की तुम्ही सांगितल का सगळ्यांना ? "
   " तुम्ही फ्रंटला आहात . त्यामुळ  ते चांगल दिसत नाही . "
   " अहो फ्रंट काय आणि दुसरीकडे काय चांगल नाही दिसत ते कुठही चांगल नाहीच ना दिसणार . त्यामुळे सगळ्यांनाच सांगा ना . एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम कशाला ? "
   आता यांच्या फ्रंट आणि बॅक मुळे आमच फ्रंट आणि बॅक  आडल होत . आणि आता मंजूही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हती .बराच वेळ याच्यावर काथ्याकुट करून झाल्यानंतर शेवटी त्या लोकांनाच मंजूच म्हणन मान्य कराव लागल . ते गेल्यानंतर पटकन दार बंद करून घेतल . चला आता कामाला लागुया तर मंजूला अजून त्याच्यावर बोलायच होत . शेवटी काय मग तिच बोलून होईपर्यंत ऐकून घ्याव लागल . तिच झाल्यावर तिला जवळ ओढून घेतल . तिची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती ती हलकेच बाजूला केली . तिला स्वतः जवळ आणखी ओढली . तिची बट परत चेहऱ्यावर आली . आता हलकेच बोटांनी ती बट व्यवस्थित तिच्या कानाच्यामागे खोवली . किती सुंदर दिसते आहे मंजू , ओह् मार डाला . माझे ओठ तिच्या ओठांच्या दिशेने निघाले होते . ओठातील अंतर कमीकमी होत चालल होत . तेवढयात टिंग टाँग ... परत बेल वाजली आणि मंजूने अक्षरशः मला ढकलून दिल .
   " अहो पहा ना ते परत आले असतील . त्यांना अजून काहीतरी मुद्दा भेटला असेल म्हणून परत आले असतील तुम्ही व्हा पुढे मी येतेच जरा आवरुन माझ . "
   अरे काय चालल आहे ? गेलो तसाच बाहेर आणि उघडला दरवाजा . बाहेर वॉचमन उभा होता .
   " पानी भरके रखना साहब . पानी काफी कम बाकी है टंकी में . "
   तेवढयात मंजू बाहेर आली आणि तिच्या कानावर ही गोष्ट पडताच तिन आज्ञा केली
     " चला हो लवकर पाणी भरून घेऊ या . "
   चला आता काय करणार भरतो पाणी . आज काय याच पाण्याच बघुया . आमच  पाणी  नुसत साठूनच राहिल आहे ते कधी सोडायच काय माहित ?
   " अहो "
   " हो आलो आलो "


                         ..... क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .

सावज (भाग ७)

त्या पावसाळी वातावरणात तो आला , त्याची गाडी बंद पडली होती . तिने त्याला थांबायला सांगितलं . त्या दोघांचं ट्युनिंग जमत होत . पण अचानक काही झालं आणि तो तिच्यापासून दूर झाला . सकाळी फार काही न बोलता तो गेला . त्याने तिला बाहेर भेटायला बोलावलं होत तिथेही काही घटना अशा घडल्या कि दोघांना तसंच माघारी यावं लागलं . बऱ्याच दिवसांनी त्याने तिला परत भेटायचं असल्याचं सांगितलं . तिने त्याला दुसऱ्या दिवशी बोलावलं . नंतर त्याच्या लक्षात आलं कि त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे त्याने सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत यायचं ठरवलं होत . पण जाताना त्याची गाडी बंद पडली आणि त्याला जायला उशीर झाला . तिथे पोहोचल्यावर ती त्याला नाही दिसली . कसल्याशा हालचालीने त्याच लक्ष वेधलं आणि तो तिकडे गेला . त्याला नंतर जाणवलं तो जंगलाच्या फार आत आला आहे . त्याने माघारी जाण्याचं ठरवलं आणि अचानक ती भेटली . ते दोघे माघारी आले . दोघेही आता एकमेकांमध्ये गुंफले जाण्यासाठी अधीर झाले होते . तिच्या त्या पाशवी रुपाला पाहून तो पुरता हबकला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली . रस्त्याने जाताना अचानक त्याच्या डोक्यात...

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .