मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तिची कहाणी

     आज आसपास सगळं कस शांत आहे . पण एक वेळ होती जेव्हा असं नव्हतं.      " बाजूला हो. त्याने एका हातानं तिला ढकललं . त्याच्या ताकतीसमोर तिचा काय निभाव लागणार होता, ती धडपडत खाली पडली. आज तो भलताच पिला होता व परत दारू पिण्यासाठी निघाला होता . त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता . काहीतरी अघटित होईल म्हणून ती त्याला अडवत होती . पण त्या अवस्थेतही तो तिला आवारत नव्हता . ती परत उठली आणि त्याला विनवू लागली . पण तो तीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . पण ती प्रतिकार करतच होती . शेवटी त्याने तिला परत खाली पाडलं आणि एक जोरदार लाथ मारली. ती तिच्या पोटात बसली. असह्य वेदना होऊन ती तशीच तळमळत पडली. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याने तशाच आणखी चार-पाच लाथा तिला मारल्या. ती अंग मुडपून लाथ पोटात बसणार नाही याचा प्रयत्न करत होती. पण तरीही ते तिला सहन होत नव्हतं. तिला एव्हढं मारून झाल्यावर त्याच समाधान झालं असावं. तो तळमळत पडलेल्या उमाला ओलांडून बाहेर पडला . =============================================================   ...

Love u Ruku

" अरे मैं जाऊ के रुकु ? " " रुकु~~~~ " " अरे रुकु क्या बोलते सिधा रुको बोलो ना . " " तुम जाओ फुफी . ओ तुमको नई बोले . ओ मेरेको बुलारिती . " " ये लडकी का तो मैं क्या करू " " तुम कूच मत करो खाली ये बोलो मुझे क्यू बुलाते " " अरे वो शबनम के पास जाके आ तो " " कायकू "

पर्याय

" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . " अग काय कशी लाली आली आहे ? " शमाने रूपालीला विचारलं . " तू कधी आणि कशी पहिली " " अग  लाल  दिसतायत कि गाल  " " ते होय " " का तुला काय वाटलं  ? " " काय नाही . बर ते सोड तू बोल काय म्हणत होतीस ? " " अग किती प्रेमात पडली आहेस त्याच्या दुसरं काही सुचत कि नाही तुला ? " " नाही सुचत तुझी काही हरकत आहे का ? " ती तडक बोलली " नाही बाई तू काही बोलू देणार आहेस का आम्हाला " शमाला आता बोलायला काही...

बावरे प्रेम हे ..... भुरळ

बावरे प्रेम हे  ... !!!! प्रेम जगातील सर्वात सर्वात सुंदर भावना. आपण कुणावर प्रेम करावे आणि त्याचेही आपल्यावर प्रेम असावे हि किती सुंदर गोष्ट आहे . पण नेहमीच असं होत असं नाही . कधीकधी हे प्रेम व्यक्तही होत नाही आणि वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते . कधीकधी प्रेम व्यक्त तर होत पण समोरच्याचा त्याला प्रतिसाद मिळत नाही . कधी दोघांचंही प्रेम असत एकमेकांवर पण इतर काही कारणांमुळे त्यांना ते मिळवता येत नाही . पण काही लोक फार सुखी असतात ज्यांना हे प्रेम मिळत आणि ते एकत्रही येतात , विवाहबंधनात बांधले जातात . पण तिथंही पुढे काहींचं प्रेम पाहिल्यासारखं, लग्नाआधीसारखं राहतच अस नाही काही लोकांना कल्पना आणि वास्तव यातील फरक जाणवू लागतात काहींच्या आयुष्यात इतर गोष्टीच इतक्या प्रश्नार्थक पाने समोर येतात कि प्रेम कुठेतरी हरवून जात . काहींच्या प्रेमाला वेळेनुसार ओहोटी लागते पण काही असतात ज्यांचं प्रेम हे आयुष्यभर तसाच टिकून राहत व ते त्यांच्या सोबत राहत . प्रेमाचे हे सगळे वेगवेगळे रंग या सर्वांचा आपलाच आनंद आणि आपलाच दुःख असत . या प्रेमरंगाना घेऊन येतो आहे बावरे प्रेम हे च्या माध्यमातून .....

i care for u

" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे " " तुझी काळजी आहे ना " " नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे " " तू असतीस समर्थ तर काय होत " " लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल " " असं काही नाही " " हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? " ती रडवेली झाली होती . " तुला काय करायचं आहे ? ...

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .  " Its ok "  " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय "

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

   " अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .    " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .    " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .    " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .    " का त्याला तू किस करणार आहेस ? "    " काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .