मुख्य सामग्रीवर वगळा

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग १ )

         तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे  उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी  पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि  ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे .....




  " ए हाय , कसा आहेस ? "

  " कुठं होतीस ? "

  " का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....."

  " तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत . "

  " हो तुला भांडायला कोणी नसेल तर बरं वाटणार नाही ना .."

  " तू असतेस तेव्हा भांडतो , पण आता तू नव्हती तर ठीक वाटत नव्हत . "

  " साहजिक आहे तुला सवय झालीय माझ्याशी भांडण्याची , त्यामुळे मी नसताना तुला ठीक वाटत नव्हत .
सवय झालीय , पण ती तुझ्याशी भांडायची नाही तर तुझी . "

  " म्हणजे ... "

  " म्हणजे तू नव्हतीस तर जीव कासावीस झाला होता, कामात लक्ष लागत नव्हत माझं , का ते मला माहित नाही , वाटतंय तुझी सवय झालीय मला . "

  " काहीतरीच काय चल जाऊया का ? "

  " थांब ना थोडी बोलायचं होत तुझ्याशी  . "

  " बोल ना "

  " कस सांगू आणि कस नाही ते नाही समजत आहे , पण एक सांगू तुझ्याबद्दल काहीतरी वाटतय एव्हढं नक्की . पण हे फक्त मलाच वाटतंय कि तुलाही ? "

  " अरे  काय वाटतंय , काय बोलतोय ? ते समजत हि नाहीय मला . "

  " समजत नाहीय कि समजून घेत नाहीयेस . "

  " आपण जाऊया का ? आज तुझं काही खर नाहीय ? आपण नंतर बोलूया ना ....."

  " अग ऐक तरी "
      
  " please मला comfortable नाही वाटत आहे. आपण जाऊया please "

  " ठीक आहे चल "

           आता कोणीही काही बोलत नव्हत आणि कुणाला काय बोलावं आणि एकमेकांकडे पहावं हेही समजत नव्हत. जातानाही ती सहजता नव्हती दोघांच्यात . तिने कसतरी वर पाहिलं त्याच्याकडे आणि मुश्किलीने smile  करून ती निघालीही .

           खूप अवघडलेपण वाटत होत काय विचार करावा ? खरच असाच विचार करतोय का तो ? कि मलाच वाटतय असं . काल खरंच काय सुचतही नव्हत , त्याचीच आठवण येत होती . समोर असला कि भांडत असतो नेहमी . पण नव्हता समोर तर काही सुचत नव्हत मला . कधी वाटलं नाही असं पण आता असं का वाटतंय . काय करू थांबवू असा विचार करायचा कि जस वाटतंय तस वाटू देऊ. नको मला असा विचार करून चालणार नाही किती फरक आहे आमच्यात आणि परत ... नकोच हा विचार नकोच

  " ए हाय कशी आहेस ? "

  " ठीक आहे "

  " काय ग काय झालं अशी का दिसतेयस ? "

  " कुठं काय काही नाही बर येते मी थोडं काम आहे माझं . "

  " असं का करतेयस ? काय झालाय सांगशील का ? "

  " काहीच नाही ... "

  " असं नाही करू देणार तुला मी , आज मला सांगितल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही मी . "

  " तुला कळत नाहीये का मला काम आहे ? आता वेळ नाही मला मला जाऊ दे . "

  " हे बघ "

  " please ... "

  " ठीक आहे जा तू , पण वेळ असेल तेव्हा नक्की सांग मला काय झालाय ते . "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर