मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार १

          उरोज  नितंब  आणि   तसलेच  काही  शब्द  असलेल पुस्तक  होत  ते  .  शेजारी  बसलेला  मुलगा  ते  वाचत बसला  होता  .  छे  नुसत  अस  काही  वाचुनही  लोक एक्साईट  होतात  . नाही  म्हणजे  आपण  एक्साईट व्हायला  हव  कि  नको  .  काही  हरकत  नाही ,  पण  आता आपले  दिवस  कर्तृत्व  दाखवण्याचे  ,  कृती  वाचत बसण्याचे  नाहीत  .  पण  काय  हरकत  आहे  अस  वाचून स्फुरण  चढणार  असेल  तर  .
 हं  किती  दिवस  झाले बायकोशी  नीट  बोलणही  झाल  नाही  .  चला  आजचा दिवसच  चांगला  आहे  आज  चक्क  बसायला  जागा मिळाली  आणि  मग  ते  पुस्तक  चांगलच  स्फुरण  चढल कि  चला  एकदा  घरी  पोहोचलो  कि  मग  या  उत्साहाचा खरा  फायदा  होईल  . अशाच  सुखस्वप्नात  स्टेशन  आल . चला  आज  कस  मस्त  वाटतय  .  तेच  ऑफिस  आज एकदम  भारी  वाटतय  .  त्याच  उत्साहात  कामाला सुरूवात  केली  .  कायमस्वरुपी  एक  हास्य  पसरून  राहिल  होत   चेहऱ्यावर .   बॉसच  बोलावण  आल .  तशीच हास्य  मुद्रा  घेऊन बॉसच्या  केबिनमधे  प्रवेश  केला  . बॉसने  कामातून  नजर  वर  करून  पाहिल .  अरर  चूक झाली  .  तिरडी बांधून  ठेवली  आहे  आणि  पुढच्या कार्यक्रमाची   तयारी   सुरू  आहे  त्यात  तुम्ही  सुहास्य वदनाने  गेला  आहे  तेव्हा  लोक  तुमच्याकडे  जसे  पाहतील तशी  परिस्थिती  निर्माण  झाली  .  क्षणात  सुतकी चेहरा  करून  त्या  वातावरणात  सामील  झालो  तेव्हा  बॉस  थोडा  नॉर्मल  झाला  . पण   मघाशी  केलेल्या पापाचा  बदला  घेण्यासाठीच  .  दिवसभर  कामाचा  नुसता  रतीब  चालू  होता  .   त्यात  बॉसची  कटकट वेगळीच  .  थोड  लवकर  निघायचा  विचार  होता  पण  बॉसने  थोडा  वेळ   जास्तच  थांबवल  . शेवटी  एकदाची सुटका  झाली  आणि  स्टेशन गाठल  .

          जो  थोडा  उशीर  झाला  होता  त्यामुळे  सगळच  बदलल  होत  , स्टेशनवर  फारच  गर्दी  झाली  होती  .  आता  अवघड  होत  पुढच . मग  कसतरी  लोंबकळत  पोहोचलो  आपल्या  इच्छित  स्टेशनवर  .  अगदीच  त्राण गेल्यासारख  वाटत  होत  . शेवटी  कसबस  घर गाठल   तिथ  पोहोचल्यावर आठवण  आली  अरे  मोकळ्या  हातानेच  आलो  आपण  .  निदान  गजरा  तरी  आणायला  हवा होता . जाऊदे  आता  परत  जाऊन  काही  आणण्याची  अजिबात  इच्छा  नाही  .  बायकोन  दार  उघडल . हं आज खरच  सुंदर  दिसते  आहे . हे विचार  क्षणभरच  मेंदूत तरळले असतील  तेवढयात  तिन  तोंड उघडल  ते  बंद  न  करण्याच्या  इराद्यानेच  .  सगळ्या  गोष्टींवर प्रेम  हाच  इलाज  असतो . थोड रोमँटिक  होत  तिच  तोंड स्वतःच्या  तोंडाने  बंद  केल.

          आत  शिरायला  अजिबात  जागा  नव्हती  . तसाच  थोडा  जोर  लावून  एकदाचा आत  शिरलो  .  आज  काही  पर्याय  नसल्यामुळे  सगळा  प्रवास  लटकतच  करावा  लागला  .  विचार  विचार आणि  नुसते  विचार  होते  डोक्यात .

          तिला  आज  बहुतेक  तोंड  बंद  तरी  करायच  नव्हत  तिने  स्वतःला  वेगळ  करत  परत  बोलायला  सुरूवात   केली   .  बराच  वेळ  बोलत होती  ती . रात्री  सगळ  आवरल्यावर  आली  ती  .  झाल  शेवटी  एकदाच  सगळ   काय  होत  ते  प्रेम  शारीरिक  गरज  का  नुसत  आपल  रुटीन   .

       
                                                                                                                                 .....क्रमशः


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर