मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .  " Its ok "  " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय "

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

   " अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .    " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .    " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .    " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .    " का त्याला तू किस करणार आहेस ? "    " काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? " एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "

पूर्वा ( भाग २ )

    " अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . "  राहुलची आई तिला बोलावत होती .     " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा     " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची  इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला.    " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "     " अगं तुला कुठं हि काम सांगू . "

पूर्वा ( भाग १ )

     ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं  माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .

बाप

   " अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं.    " तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं .    " बर जा आत "         त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . "