मुख्य सामग्रीवर वगळा

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

   " अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच  ना एकमेकांना . "

   " म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? "

   " अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . "



   " कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा  "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली .

   " काय ते ? मी ऐकलं नाही . "

   " तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . "

   " अगं असं का सांग ना काय ते ? "

   " ते राहू दे, ते मी असाच बोलत होते . तू सांग तुझं लक्ष असत ना आजकाल कॉलेजमध्ये लेक्चर करत नाहीस . "

   " आता मी लेक्चर द्यायला लागल्यावर कोण थांबणार आहे ? "

   " PJ बंद कर रे . "

   " मग तूच तर म्हटलीस  . "

   " मी तू लेक्चर अटेंड नाही करत त्याबद्दल बोलतेय , परत attendance चा प्रॉब्लेम होईल बर का . "

   " असू दे, तुला काय त्याच ? माझं काय चाललय  तुला काय माहित ? "

   " का काय झालं ? "

   " हम्म काय सांगू ? "

   " ए सांगणारेस का ? "

   " आता काय आणि कस सांगू  ? "

   " ए बास  राहूदे तुझं . "

   " अग तस नाही , सांगतोय मी "

   " अरे बर आठवलं मला जरा काम आहे आलेच मी . "

   " अग ऐक तरी ...."

   " ए परत आता जाते मी . "
 ....................................................................................................................................................................
   " अग काय कसलं एव्हढं काम आहे तुझं ? त्याला बोलायचं होत ना तुझ्याशी ? ऐकून नंतर जाता आलं असत ना ?

   " अग  उगाच भाव खात होता म्हणून निघाले आणि त्याच काही महत्वाचं नसत उगाच काहीतरी TP सुरु असतो .असं खूप serious असल्यासारखं बोलायचं आणि खरं तर महत्वाचं काहीच नसत . म्हणून निघाले ."

   " पण खरंच काही असेल तर उगाच नको ... "

खरंच काही असेल का ? उगाच निघाले का मी ? थांबले असते तर ? छे उगाच आले मी काय बोलायचं होत त्याला ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

शृंगार २

          आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल  ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत .