मुख्य सामग्रीवर वगळा

I Love You....!!!!

" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . "

   " अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . "

   " अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . "

   " चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला             मानलं . "

 
" अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . "

   " ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत "

   " तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . "

   "  ए बस झालं हा तुझं . "

   " अरे  त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार  राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं . अरे इथं चालय काय आणि तू करतोय काय . चला रे . " सगळ्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना निघत होत्या . पण राहुल स्वतःतच मग्न होता त्याच्या डोक्यात दुसरच काहीतरी चाललं असावं असं .
=============================================================

   " माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग . मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत . इतके दिवस मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही सांगता आलं ग . आज सांगतोय I Love You... !!! I Love You Swati....!!! I Love You.... !!!!

    " का थांबलास इतके दिवस ? माझे कान आतुरले होते हे ऐकण्यासाठी . I Love You too...!!" तिच्या डोळ्यात आभाळ दाटून आलं होत आणि ती त्याच्या डोळ्यात खोल बुडत चालली होती .

    इतक्यात  " यो... राहुल, तू तर कमालच केलीस राव आम्हा सगळ्यांपेक्षा भारी केलस.  आजचा winner तू आहेस .  The Best of the Best . "

    " अरे याला कुणी तरी सांगा नको तिथं इंग्रजी झाडत असत . "

    सगळे जमा झाले होते तिथं आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचं होत . सगळा गोंधळ गोंगाट चालला होता .

     तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत न्हवते . तिला काय करावं ते सुचत न्हवत . राहुलला मित्रांनी खांद्यावर घेतलं .  त्याला काहीतरी बोलायचं होत पण कुणी त्याच ऐकतच न्हवत . शेवटी न राहवून तो ओरडला, " थांबा मी नाहीये आजचा winner आणि मी खोट बोलून तिला फसवलही नाही . मला गेले कित्तेक दिवस तिला हे सांगायचं होत पण न्हवत जमत . आज खूप प्रयत्न करून हे बोलू शकलो . पण नंतर तर तुम्ही माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी टाकायला निघाला . माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर I Love You Swati आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग . मला या जगात दुसरं काही नको आहे मला फक्त तू हवी आहे . तुझी साथ हवी आहे . देशील ना मला साथ . तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू तसेच होते सोबत तिच्या ओठावर हसूही होत . त्याने आपला हात पुढे केला . देशील ना मला साथ तिनेही हात पुढे करून त्याच्या हातात दिला आणि मानेने हलकेच होकार दिला . त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं तीही आवेगाने त्याला बिलगली . सर्वानी एकच गलका केला .

     आजचा 1st April ' April Fool ' नाही तर ' Cool ' ठरला होता ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर