मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बावरे प्रेम हे ..... भुरळ

बावरे प्रेम हे  ... !!!! प्रेम जगातील सर्वात सर्वात सुंदर भावना. आपण कुणावर प्रेम करावे आणि त्याचेही आपल्यावर प्रेम असावे हि किती सुंदर गोष्ट आहे . पण नेहमीच असं होत असं नाही . कधीकधी हे प्रेम व्यक्तही होत नाही आणि वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते . कधीकधी प्रेम व्यक्त तर होत पण समोरच्याचा त्याला प्रतिसाद मिळत नाही . कधी दोघांचंही प्रेम असत एकमेकांवर पण इतर काही कारणांमुळे त्यांना ते मिळवता येत नाही . पण काही लोक फार सुखी असतात ज्यांना हे प्रेम मिळत आणि ते एकत्रही येतात , विवाहबंधनात बांधले जातात . पण तिथंही पुढे काहींचं प्रेम पाहिल्यासारखं, लग्नाआधीसारखं राहतच अस नाही काही लोकांना कल्पना आणि वास्तव यातील फरक जाणवू लागतात काहींच्या आयुष्यात इतर गोष्टीच इतक्या प्रश्नार्थक पाने समोर येतात कि प्रेम कुठेतरी हरवून जात . काहींच्या प्रेमाला वेळेनुसार ओहोटी लागते पण काही असतात ज्यांचं प्रेम हे आयुष्यभर तसाच टिकून राहत व ते त्यांच्या सोबत राहत . प्रेमाचे हे सगळे वेगवेगळे रंग या सर्वांचा आपलाच आनंद आणि आपलाच दुःख असत . या प्रेमरंगाना घेऊन येतो आहे बावरे प्रेम हे च्या माध्यमातून .....

i care for u

" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे " " तुझी काळजी आहे ना " " नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे " " तू असतीस समर्थ तर काय होत " " लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल " " असं काही नाही " " हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? " ती रडवेली झाली होती . " तुला काय करायचं आहे ? ...

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत .  " Its ok "  " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय "

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

   " अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता .    " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता .    " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती .    " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली .    " का त्याला तू किस करणार आहेस ? "    " काय " असल काय ती बोलेल याचा त्याला अंदाजच नव्हता . त्यामुळे तो एकदम चमकून बोलला .

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? " एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "

पूर्वा ( भाग २ )

    " अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . "  राहुलची आई तिला बोलावत होती .     " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा     " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची  इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला.    " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "     " अगं तुला कुठं हि काम सांगू . "