मुख्य सामग्रीवर वगळा

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग २ )

      जितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतेय तेव्हढीच ओढली जातेय मी त्याच्याकडे काय होतंय मला कळत नाहीये , का आणि कस होऊ शकत असं माझ्या बाबतीत , आणि सरळ बोललेही नाही त्याच्याशी इतके दिवस . काय होतंय दुसरं काही नाही पण friend म्हणून बोलायला काय हरकत आहे , आणि इतके दिवस बोलत होतोच कि आपण , त्याला काय होतंय , बस जे वेगळं वाटत होत त्याचा विचार नको करायला . एक friend  म्हणून बोलूया ना .



  " Hi, कसा आहेस ? "

  " अरे तुझ्याशीच बोलतेय मी , इकडे तिकडे काय बघतोय . "

  " तू ...  आपलं आपण माझ्याशी बोलताय ? या पामरावर फारच उपकार झाले .

  " ए असं बोलणार असशील तर मी नाही बोलणार तुझ्याशी , तू असा बोलतोस म्हणूनच राग आला होता मला तुझा आणि म्हणूनच बोलत नव्हते मी तुझ्याशी . "

  " खरच  राग आला होता तुला ? "

  " हो . "

  " मग मी असं कधी पुन्हा करणार नाही . "

  " नक्की ना ? "

  " अगदी नक्की  "
तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी smile आली
  " पण तुला असं वाटतंय का मी असं काही बोलेन , आला राग तर आला मला काय फरक पडत नाही मी असाच आहे आणि असच बोलणार . "

  " बघ परत तेच "

  " का काय करणार आहेस "

  " बोलणार नाही मी तुझ्याशी "

  " ए नाही बोललीस तर नाही . "

  " ठीक आहे जाते मी . "

  " ए चाललीस कुठे एव्हढ्यात भांडणाचा कोटा अजून कुठं पुरा झालाय . "

  " चल वेळ नाही मला "

  " अग थांब ना त्याने पुढं होऊन तिचा हात पकडला . "

         तिला परत थोडं अवघडल्यासारखं झालं पण तरीही स्वतःला शक्य तितकं normal  ठेवत ती बोलली

  " जाऊदे मला माझा mood  नाही आता भांडायचा . "

  " अग  अशी काय करतेय गं  माझी मैत्रीण ना तू तुझ्यावर इतकाही हक्क नाही का माझा ? "

  " हो friends  आहोत आपण पण दर वेळेस भांडायला हवच का ? "

  " अग तस नाही पण आपण त्याच्याशीच भांडतो ज्याच्यावर आपला हक्क आहे आणि तुझ्यावर आहे ना माझा हक्क . "

  " तो आहे रे पण दर  वेळेस भांडावच असं आहे का ? "

  " बर ठीक आहे मग काय करायचं आपण सांग तू  . "

  " एक सांग मला आपल्याला छान अस नाही का बोलता येणार ? "

  " ठीक आहे बोलूया ना आपण तू सांग कोणत्या topic वर बोलायचं आपण ? "

  " ummm नाही सुचत मला . तुला काय सुचतंय का ? "

  " बघ असं ठरवून बोलायचं म्हटलं तर काही सुचत नाही बोलायला . "

  " खर आहे तुझं . "

  " पण मग काय करूया ? "

  " भांडूया का ? "

  " काय रे परत तेच .  "

  " अग ऐक ना , प्रत्येक नात्याला त्याची त्याची space  असते , त्याच त्याच विश्व असत  . तुझ्यामाझ्यात छान understanding आहे एकमेकांना काय बोलायच आहे हे आपण न बोलताही समजू शकतो  ना .. "

    खरंच असं असत तर किती बर झालं असत . आज जे मला वाटतंय ते तुला न बोलता कळलं असत तर किती बर झालं असत . हा विचार करता करता हलकंसं smile आलं तिच्या चेहऱ्यावर .

  " अग काय ? एकटीच का हसतेय ? "

  " आपल्यात छान understanding आहे ना तुला मी न बोलताही समजतं ना ? मग सांग ना मी का हसतेय ते ? "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दभ्रमर

काय झालं इतकं मनापासून प्रेम केलं पण गेली ना ती . ती जाणारच होती. विषय फक्त एव्हढाच होता कि कधी. ते ती आता गेली. तशी चूक माझीच होती, इतकही जास्त प्रेम करू नये कुणावर. हे प्रेमच असत जे तुम्हाला कमजोर करत. किती प्रेम केलं तिच्यावर . इतकं कि भीती वाटायची ती आपल्याला सोडून तर नाही ना जाणार . या भीतीपायी ना तिच्यावरच प्रेम स्पष्टपणे व्यक्त करता आलं. ना तस जगता आलं जसे आपण आहोत . पण एव्हढ करून शेवटी वाटणारी भीतीच खरी ठरली . त्याच्या डोळ्यात पाणी होत . " अरे काय हे मुलांनी एव्हढ कमजोर असू नये. " त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात होता . त्यानं चमकून वळून पाहिलं . तर सुरेशदादा होते . सुरेशदादा एक भारदस्त व्यक्तिमत्व होत . आसपासच्या भागातली तरुण मंडळी त्यांना मानत होती . तब्येतीनं भारदस्त गडी . आधी आखाड्यात आणि आता नवीन जमान्यानुसार जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी . तब्बेतीच वेडच लागलं होत म्हणा ना त्यांना ते त्यांचं हे वेड बाकीच्या तरुण मुलांनापण लावत होते . राजकीय व्यक्तींसोबत उठणं-बसणं असायचं त्यांचं . स्वतः अजून राजकारणात नव्हते आले पण कधीही आले तर नक्की जिंकतील असा दांडगा जनसंपर्क .

शृंगार ४

          मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .    " अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर  ती खाली लागेल  . "    " असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "    " ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "    " चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "    " चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "    तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .    वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम  तिच्या अंगावर स्प्रे केला  . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर

ती सध्या काय करते

   संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं  पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल..  कुठे असेल ..  ती सध्या काय करते ?